विशाल निकमने शिवलीला पाटील यांच्याविषयी भावूक मत व्यक्त केले.  
Latest

BBM : शिवलीला खूप काही शिकवून गेली-विशाल निकम

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला. जेव्हा किर्तनकार शिवलीला पाटील यांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय किर्तनकार शिवलीला पाटील यांनी घेतला होता. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रू अनावर झाले. कालच्या या त्यांच्या निर्णयानंतर विशाल आणि इतर सदस्य त्यांची आज मते मांडताना दिसणार आहेत. विशाल निकम म्हणतो -शिवलीला पाटील खूप काही शिकवून गेली.

दोन दिवस रंगलेल्या या बिग बॉसच्या चावडीमध्ये काहींची कानउघडणी झाली. काहींना महेश मांजरेकर यांनी समजावून सांगितले. काही सदस्यांना ते कसे आणि कुठे चुकले हे देखील दाखवून दिले.

वूटद्वारे आलेल्या काही अतरंगी डिमांडसाठी जय आणि विशाल राजी झाले आणि जयने त्यामध्ये बाजी मारली. त्याचसोबत चुगली बूथद्वारे जयच्या फॅनने त्याला चुगली केली. विकास – विशाल काय म्हणाले हे उघड केले. बघूया या नव्या आठवड्यात कोण कोणाला भिडणार? कोणते नवे टास्क रंगणार? कोण बाजी मारणार? कोणाच्या हाती हार येणार? कोणाला मिळणार कॅप्टन बनण्याचा बहुमान?.

पाटील यांच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भावूक झाला. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना दिसणार आहे. विशाल म्हणाला-ती असायला हवी होती. खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे. आपल्यावर तो कधी नाही मोडणार. ते असताना काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात. ते आयुष्यभराची जागा करून जातात. त्यातली ती आहे.

मीनल शाहने देखील सांगितले-ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे. तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली कधीच. तिला इतकं नॉलेज आहे त्याच्यासमोर कोणीच काही नाहीये. पुढे काय होणार? जाणून घेण्यासाठी बघत रहा -बिग बॉस मराठी सिझन तिसरा रोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेदेखील वाचलंत का?-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT