संग्रहित छायाचित्र 
Latest

Bank official Suicide : उत्तर प्रदेशमध्‍ये महिला बँक अधिकार्‍याची आत्‍महत्‍या, सुसाईड नोटमध्‍ये ‘आयपीएस’सह तिघांच्‍या नावाचा उल्‍लेख

नंदू लटके

अयोध्‍या येथे पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी असणार्‍या श्रद्धा गुप्‍ता यांनी आत्‍महत्‍या (Bank official Suicide ) केल्‍याचा धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे.  विवेक गुप्‍ता, आयपीएस अधिकारी आशीष तिवारी, आणि पोलिस कर्मचारी अनिल रावत यांच्‍या नावाचा उल्‍लेख त्‍यांनी सुसाईड नोटमध्‍ये केला आहे. माझ्‍या मृत्‍यूस या तिघांना जबाबदार धरण्‍यात यावे, असे त्‍यांनी म्‍हटलं आहे. याप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला असून पोलिसांनी विवेक गुप्‍ता याला अटक केली आहे. दरम्‍यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री व समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी याप्रकरणाची उच्‍चस्‍तरीय चाैकशी व्‍हावी, अशी मागणी केली आहे. .

श्रद्धा गुप्‍ता या अयोध्‍या मधील पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी होत्‍या.शनिवारी दुपारी त्‍यांनी गळफास लावून घेवून आत्‍महत्‍या केली. दोन दिवस झाल्‍यानंतरही त्‍यांनी घराचा दरवाजा उघडला नाही. शेजार्‍यांनी याची माहिती घरमालकांना दिली. पोलिस घटनास्‍थळी आले. दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. यावेळी श्रद्धा गुप्‍ता यांनी गळफास लावून घेवून आत्‍महत्‍या केल्‍याचे निदर्शनास आले.

(Bank official Suicide ) सुसाईट नोटनुसार पोलिस तपास सुरु

पोलिसांना मृतदेहाजवळ सुसाईटन नोट सापडली. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, आयपीएस अशीष तिवारी, विवेक गुप्‍ता आणि अनिल रावत हे माझ्‍या मृत्‍यूस जबाबदार आहेत. आत्‍महत्‍या करत असल्‍याने नातेवाईकांनी मला माफ करावे, असेही त्‍यांनी सुसाईट नोटमध्‍ये नमूद केले आहे.
श्रद्धा गुप्‍ता यांचे विवेक गुप्‍ता याच्‍याशी लग्‍न ठरले होते. काही कारणास्‍तव हे लग्‍न मोडले होते. मात्र यासंदर्भातील कोणतीही तक्रार पोलिसात नोंद झाली नव्‍हती. मात्र सुसाइड नोटमध्‍ये फैजाबाद येथील पोलिस कर्मचारी अनिल रावत यांच्‍या नावाचा उल्‍लेख आहे. पोलिसांनी त्‍याचा शोध घेतला असता असा कर्मचारी नसल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. पोलिसांनी श्रद्धा गुप्‍ता यांचा मोबाईल फोन जप्‍त केला आहे.

श्रद्धा गुप्‍ता २०१५ मध्‍ये वरिष्‍ठ लिपीक म्‍हणून बँकेत रुजू झाल्‍या होत्‍या. यानंतर विभागीय परीक्षामध्‍ये यश संपादन करत त्‍या बँक अधिकारी झाल्‍या होत्‍या. सध्‍या त्‍या पंजाब नॅशनल बँकेत उपशाखाधिकारी म्‍हणून कार्यरत होत्‍या.

सुसाईट नोटमध्‍ये उल्‍लेख असणारे आयपीएस अधिकारी आशीष तिवारी हे जून २०१९मध्‍ये आयोध्‍यामध्‍ये वरिष्‍ठ पोलिस अधीक्षक
पदावरु रुजू झाले होते. सुमारे आठ महिने ते या पदावर होते. सध्‍या ते लखनौ येथे कार्यरत आहेत. पोलिसांनी विवेक गुप्‍ता, आयपीएस अधिकारी आशीष तिवारी, आणि पोलिस अधिकारी अनिल रावत यांच्‍याविरोधात आत्‍महत्‍येस प्रवृत केल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याची माहिती पाेलिस सूत्रांनी दिली.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT