पुढारी ऑनलाइन डेस्क : कोशिंबीर हा संपूर्ण भारतीय उपखंडातील जेवणाच्या ताटेत हमखास असणारा पदार्थ. भारतीय जेवणाचे ताट कोशिंबीरीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. संपूर्ण भारतीय उपखंडात त्या-त्या प्रांतानुसार थोडेफार बदल करून कोशिंबीर केली जाते. कोशिंबीरीचे खूप प्रकार आढळतात. काकडीची, टोमॅटोची, मेथीची, मुळ्याची, मिक्स कोशिंबीर अशा विविध प्रकारच्या कोशिंबीर पैकी काकडीची कोशिंबीर ही संपूर्ण भारतात आढळते. पण या व्यतिरिक्त उपवासासाठी देखील कोशिंबीर करता येतात. त्यापैकी केळाची झटपट होणारी एक खास कोशिंबीरीची रेसिपी इथे देत आहोत.
साहित्य – दोन छान पिकलेली केळी, दही एक वाटी, साखर चार चमचे, मध मोठे दोन चमचे, फक्त गोड कोशिंबीर नको असेल तर मध न टाकता मिरची टाकू शकता. त्यासाठी चार हिरव्या मिरच्य, दोन चमचे तूप, शक्य असल्यास थोडे अत्तर, तुळशीची पाने. थोडेसे डाळींबाचे दाणे, चवीनुसार मीठ
कृती क्रमांक एक केळाची गोड कोशिंबीर – केळ्यांची सालटी काढून त्याच्या थोड्या बारीक-बारीक फोडी करून घ्या. दह्यात साखर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले फेटून घ्या. आता केळ्याच्या फोडी आणि डाळिंबाचे दाणे, दह्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर यावर दोन मोठे चमचे मध आणि थोडे अत्तर टाकून मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्या. केल्यानंतर 15 मिनिटे हे मिश्रण भिजू द्या. त्यानंतर खाण्यापूर्वी तुळशीची पाने धुवून त्यावर पसरवा आणि पानात वाढा…
कृती क्रमांक दोन – काही जणांना फक्त गोड खाण्यासाठी आवडत नाही. त्या व्यक्तिंनी मध आणि अत्तर न टाकता तुपात मिरच्या बारीक करून त्याला छान फोडणी द्या. ही फोडणी मोहन घालता त्याप्रमाणे दही केळीच्या मिश्रणात टाकून एकजीव करून घ्या. त्यानंतर 15 मिनिटे मिश्रण झाकूण ठेवा. नंतर जेवताना तुळशीची पाने धुवून त्यावर पसरवा आणि पानात वाढा…
हे ही वाचा