Bageshwar Baba  
Latest

मी कोणी तपस्‍वी किंवा माइंड रिडर नाही : पंडित धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्री

निलेश पोतदार

रायपूर : पुढारी ऑनलाईन-  'नागपूर विवादा'पासून बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्री हे चर्चेत आहेत. नागपूर विवादावर आपली बाजू स्‍पष्‍ट करताना एका वृत्‍त वाहिनीला माहिती देताना बागेश्वर महाराजांनी म्‍हटलं आहे की, "मी कोणी तपस्‍वी किंवा माइंड रिडर नाही. मात्र मी ज्‍यावेळी गादीवर बसलेला नसतो, त्‍यावेळी मी एक साधारण मनुष्‍यचं असतो, मात्र गादीवर बसताच बालाजी आणि हनुमान यांचं ध्यान केल्‍यावर जो आदेश मिळतो, तो मी कागदावर लिहितो. जेंव्हा लोक माझ्याकडे एखादी समस्‍या घेवून येतात तेव्हा मी आमच्या गुरूंकडून प्रेरणा घेतो आणि त्या समस्‍ये विषयी कागदावर लिहितो," असेही ते म्‍हणाले.

अंनिसचे पंडित धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्रींना आव्‍हान

बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेशवर सरकार यांनी नागपुरात येऊन भक्तांसमोर नव्हे तर पत्रकार भवनात आपले दावे पूर्ण करावेत, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी दिले होते. यानंतर बागेश्वर सरकार यांचे समर्थक, विहिप, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटना नागपुरात शुक्रवारी (दि.२०) रोजी रस्त्यावर उतरल्या. संविधान चौक येथे झालेल्या आंदोलनात अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

बागेश्वर बाबांना आपल्‍या भक्‍तांचासमस्‍या ऐकून त्‍या सोडवण्यासाठी दिव्य दरबार भरवतात. मात्र लोकांच्या मनातील गोष्‍ट त्‍यांनी सांगण्याआधीच बाबा मनातल्‍या मनात वाचून ते एका कागदावर लिहितात. यानंतर बाबा त्‍या अडचणीवर लोकांना उपायही सांगतात. बाबांच्या दिव्य दरबारात येणाऱ्या लोकांचे म्‍हणणे आहे की, बाबा हे सिद्ध पुरूष आहेत. बागेश्वर धाम सरकारची कथा सध्या छत्‍तीसगढ च्या रायपूर मध्ये सुरू आहे. या ठिकाणीही त्‍यांनी दिव्य दरबार लावलेला होता.

आपण फक्त आपल्या भगवंताचे साधक

बागेश्वर महाराजांनी स्‍वत:ला संत किंवा तपस्‍वी म्‍हणण्यास नकार दिला. मी काही अंतर्यामी नाही. आपण फक्त आपल्या भगवंताचे साधक आहोत. माझ्याकडे जे लोक आपल्या समस्या घेऊन येतात. त्‍या मी ऐकतो. मनुष्‍य असल्‍याने मी कोणाशीही भेदभाव करत नाही. लोकांच्या विनंतीवरून मी जे काही लिहितो. त्याच्या सूचना आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळतात. त्‍यांनी सांगितलेली गोष्‍ट मी कागदावर लिहितो. हि तर लोकांची श्रद्धा आहे की, ते स्‍वत: हा सांगतात माजी हिच समस्‍या आहे. लोकच ठरवतात की मी जे सांगितले आहे ते खरे आहे की खोटे.

प्रा. श्याम मानव यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

प्रा. श्याम मानव यांनी म्‍हटले आहे की,  'आपल्याला सनातन धर्म शिकवू नये, मी मा. गो. वैद्य यांना गुरू मानले म्हणून माझा संघाशी संबंध जोडला जाऊ शकत नाही. भविष्याचा वेध घेण्याची शक्ती त्यांच्यात असेल तर ती दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी, सीमा रक्षण, देशहितासाठी वापरता येईल' असे आव्हान त्यांनी केले. नुकतेच प्रा. श्याम मानव यांचे बागेशवर महाराज उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात व्याख्यान झाले. या वेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली होती.

आव्हान न स्वीकारताच बागेश्वर सरकार यांनी नागपुरातून पळ काढला : अंनिस

३० लाख रुपयांचे अनिसंचे आव्हान न स्वीकारताच बागेश्वर सरकार यांनी नागपुरातून पळ काढला, असा आरोप अनिसने केला होता. मात्र, अनिसच्या लोकांनी रायपूरला यावे, आम्हाला तीस लाख नको आपण त्यांचे पूर्णतः समाधान करू, असे आव्हान धीरेंद्र कृष्ण उर्फ बागेश्वर सरकार यांनी अनिसला दिले होते. गेले दोन-तीन दिवस या दावे-प्रतिदाव्यानी नागपुरात वातावरण तापले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT