Latest

Babar vs ICC Umpire: ‘त्या’ 3 धावांवर बाबरचे अज्ञान उघडकीस; ‘या’ पंचांची चपराक

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : Babar vs ICC Umpire : विराट कोहलीच्या धमाकेदार खेळाने भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना अखेरच्या चेंडूवर जिंकला. या विजयाने भारतात दिवाळीच्या पूर्वसंधेला जल्लोषात दिवाळी साजरी झाली. दुसरीकडे मात्र पाकिस्तानच्या संघाने आपल्या पराभवाला शेवटच्या ओव्हरमध्ये पंचांनी दिलेले दोन निर्णय कारणीभूत असल्याचा आक्षेप नोंदवला आहे. (IND vs PAK T20 World Cup 2022)

रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार शेवटच्या चेंडू पर्यंत अनुभवायला मिळाला. पाकिस्तान टॉस गमावला त्यानंतर पहिला फलंदाजी 8 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या. त्यानंतर विजयासाठी आवश्यक 160 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव गडगडला. पण रन मशिन विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने भक्कम भागिदारी करून टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. अखेरच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी 16 धावांची गरज होती. हार्दिक पंड्या पहिल्या चेंडूवर बाद झाला, तर दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि तो दुसऱ्या टोकाला गेला. तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने (Virat Kohli) 2 धावा काढल्या, तर चौथ्या चेंडूवर मोहम्मद नवाजने फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू वेस्ट हाईटपेक्षा उंच असल्याने पंचांनी तो चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय दिला. नो बॉल घोषीत करताच पाकिस्तान संघातील खेळाडूंनी पंचांशी बराच वाद घातला. पण विराट कोहलीने फटका मारल्यानंतर लगेचच त्या चेंडूबाबत तक्रार केली होती. पंचांनी विराटच्या (Virat Kohli) पारड्यात निर्णय देत नो बॉल जाहीर केला. त्यामुळे भारताला अतिरिक्त चेंडू आणि धावही मिळाली. भारताने पहिल्या तीन चेंडूत फक्त 3 धावा घेतल्या होत्या, तर चौथ्या चेंडूवर नो बॉल आणि षटकार मारला. त्यामुळे आता 3 चेंडूत एकूण 6 धावांची गरज होती. पुढचा चेंडू नवाजने वाईड टाकला. त्यानंतरच्या फेकलेल्या चेंडूवर विराटने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू हुकला आणि विकेटवर आदळून विकेटच्या मागे गेला. पण फ्री हिटवर क्लीन बोल्ड दिले जात नसल्याने याचा फायदा घेत डीके आणि विराटने तीन धावा काढल्या. आता पुढच्या दोन चेंडूत दोन धावा हव्या होत्या. पुढच्या चेंडूवर दिनेश कार्तिक स्टंप आऊट झाला. त्यानंतर आर अश्विन मैदानात उतरला. नवाजने पहिला चेंडू अश्विनकडे वाइड फेकला आणि पुढच्याच चेंडूवर अश्विनने चौकार मारला. याचबरोबर भारताने रोमहर्षक विजय मिळवून भारतीयांना धमाकेदार दिवाळी गिफ्ट दिले. (Babar vs ICC Umpire IND vs PAK T20 World Cup 2022)

दरम्यान, शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू नोबॉल देणे आणि चौथ्या चेंडूवरील विराटने घेतलेल्या 3 धावांवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आक्षेप घेतले होते. चौथ्या चेंडूवरील 3 धावा या बाईजमध्ये मोजल्या गेल्या, यावर आता ऑस्ट्रेलियाचे निवृत्त अंपायर सायमन टफेल यांनी मोठा खुलासा केला आहे. टफेल यांच्या या खुलाशानंतर विराटवर आक्षेप घेणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. त्यांनी 4 थ्या चेंडूवरील या 3 धावांबद्दल सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये केलेला खुलासा खालील प्रमाणे आहे :

'MCGवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल थरारक असा सामना झाला. शेवटच्या षटकात नो बॉलनंतर टाकण्यात आलेल्या चेंडूवर कोहलीचा त्रिफळा उडाला. यानंतर भारतीय संघाला ज्या बाईज धाव मिळाल्या त्यावर मला अनेकांनी खुलासा विचारला आहे. याबाबत अंपायरनी घेतलेला निर्णय योग्य आहे. चेंडू विकेटवर आदळून थर्डमॅनच्या दिशेने गेला, त्यानंतर फलंदाजांनी 3 धावा घेतल्या, त्या बाईज धरण्यात आल्या. फ्री हिटमध्ये फलंदाजाला 'आउट बोल्ड' करता येत नाही. त्यामुळे विकेटवर धडकलेला बॉल हा डेड नसतो, हा बॉल प्लेमध्ये असल्याने या धावा Laws for Byes मधील नियम पूर्ण करतात.' (Babar vs ICC Umpire IND vs PAK T20 World Cup 2022)

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT