Latest

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाला पितृशोक; पंडित खुराना यांचे दिर्घ आजाराने निधन

अमृता चौगुले

चंदीगढ; पुढारी ऑनलाईन : अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडिल पंडित खुराना (Astrologer P. Khurrana) यांचे शुक्रवारी (दि.१९) निधन झाले. अभिनेता आयुष्मान व त्याचा भाऊ अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) या दोघांनी याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मोहालीतील एका रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. पंडित खुराना हे मागील अनेक दिवसांपासून आजाराशी झुंज देत होते.  (Ayushmann Khurrana's father Pandit P Khurrana passes away)

आयुष्मान खुरानाचे वडिल पंडित खुराना ज्योतीषी होते. ते चंदीगढ येथे रहात होते आणि त्यांनी ज्योतीशास्त्रावर एक पुस्तक सुद्धा लिहले आहे. वडिलांच्या सल्ल्यानंतर आयुष्मानने आपल्या नावातील स्पेलिंगमध्ये बदल केला होता. तो आपल्या वडिलांना आयुष्याचा मार्गदर्शक, प्रशिक्षक मानत होता. (Ayushmann Khurrana)

दोन्ही बंधु आयुष्मान आणि अपारशक्ती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'आम्हाला याची माहिती देताना अत्यंत दुख: होत आहे की, आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडिल पंडित खुराना यांचे शुक्रवारी निधन झाले. या काळात तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी आम्ही कृतज्ञ राहू'. (Ayushmann Khurrana)

वडिलांनी दाखवला रस्ता

माध्यमांशी बोलताना एकदा आयुष्मान म्हणाला होता, "माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही, पण माझे वडील माझे जीवनाचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत. ते मला नेहमी 'बेटा पब्लिक की नब्ज पकड़ो' म्हणायचे आणि मी तसे केले. तो पुढे म्हणाला, कॉलेजमधून बाहेर पडताच माझ्या वडिलांनी मला घराबाहेर काढले. मी खूप शांत होतो पण ते माझ्याबद्दल खूप महत्वाकांक्षी होते. त्यांनी माझी बॅग पॅक केली आणि तिकीट बुक केले. मला घरा बाहेर काढले आणि म्हणाले – "खूप झाले आता जा अभिनेता बनायला, तू चंदीगडमध्येच तळ ठोकून बसला आहे."

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT