धनीपूर येथे साकारण्यात येत असलेल्या मशिदीचे संकल्पचित्र 
Latest

बाबरी मशिदीचे नामांतर; अयोध्येतील मशिदीचे नाव ‘मुहम्मद बिन अब्दुला’ | Babri Mosque New Name

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील धनीपूर येथे साकारत असलेल्या मशिदीचे नाव 'मुहम्मद बिन अब्दुला' असे ठेवण्यात आले आहे. या मशिदीला बाबरी मशीद असे नाव दिले जाणार नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. अयोध्या आणि बाबरी मशिद या न्यायालयीन वादात नवी मशिद बांधण्यासाठी धनीपूर येथे जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या मशिदीला बाबरी मशिद असे नाव दिले जाणार नाही, अशी माहिती ऑल इंडिया राब्ता ई मस्जिद या संघटेनच्या मुंबईत झालेल्या परिषदेत देण्यात आली. मुंबईत बुधवारी ही परिषद झाली. Babri Mosque New Name

हाजी आरफात शेख यांनी ही परिषद बोलवली होती. धनीपूर अयोध्येपासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. ६ डिसेंबर १९९२ला बाबरी मशिद पाडण्यात आली. न्यायालयीन निवड्यातून ही जागा राम मंदिर उभारण्यासाठी देण्यात आली. तर धनीपूर येथे ५ एकर जागा मशिदीसाठी देण्यात आली. सिसायत या वेबसाईटने ही बातमी दिली आहे. Babri Mosque New Name

शेख म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या जागेवर मशिद बांधली जाईल. ही मशिद भारतातील सर्वांत मोठी मशिद असेल. एकाच वेळी ५ हजार पुरुष आणि ४ हजार महिला येथे नमाज पठण करू शकतील. या परिसरात अधिकची जागा घेण्यात आली आहे. या जागेवर वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत.

या संस्थांचा सहभाग Babri Mosque New Name

या मशिदीसाठीच्या पायाभरणीचा प्रतिकात्मक समारंभ गुरुवारी झाला. या मशिदीच्या बांधकामात सुन्नी वक्फ बोर्ड, इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन, सलामती पीर दर्गा ट्रस्ट या संस्था सहभागी आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT