Latest

steve smith : स्टिव्ह स्मिथने सचिन, संगकाराला मागे टाकत केला ‘हा’ भीम पराक्रम

अमृता चौगुले

लाहोर ; पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार तथा आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ (steve smith) याने गुरुवारी मोठा विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 8000 धावा पूर्ण करणारा तो फलंदाज ठरला आहे. स्मिथने श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकाराचा (kumar sangakkara) 12 वर्ष जुना विक्रम मोडला. लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील (aus vs pak) तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्या डावात 59 धावा करणाऱ्या स्मिथला दुसऱ्या डावात 8 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 7 धावा कराव्या लागल्या.

32 वर्षांच्या स्टीव्ह स्मिथने (steve smith) आपल्या कसोटी कारकिर्दीतील 151 डावांमध्ये (85 कसोटी सामन्यात) हसन अलीच्या चेंडूवर चौकार मारून हा पराक्रम केला. कुमार संगकाराने 152 कसोटी डावांमध्ये (91 कसोटी) 8000 धावा पूर्ण केल्या. 2010 मध्ये, स्मिथने लेग-स्पिनर म्हणून कसोटी पदार्पण केले. पण लवकरच तो संघाचा आघाडीचा फलंदाज बनला. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या डावात तो १७ धावांवर बाद झाला.

स्मिथने (steve smith) 151 कसोटी डावांमध्ये 59.78 च्या सरासरीने 8010 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 27 शतके आणि 36 अर्धशतके झळकावली आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत झाली आहे. पहिल्या डावात संघाकडे 123 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथ बाद झाला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 बाद 216 धावा केल्या होत्या.

सर्वात वेगवान 8000 कसोटी धावांच्या यादीत सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 154 डावांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पा पार केला. वेस्ट इंडिजचे सर गॅरी सोबर्स (gary sobers) १५७ डावांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. तर राहुल द्रविडने (rahul dravid) 158 डावात 8000 धावा पार केल्या होत्या. मूळचा न्यू साउथ वेल्सचा असलेला स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT