Latest

औरंगाबाद : ‘तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना’, असे लिहून इंजिनियर तरुणाची आत्महत्या

अविनाश सुतार

पैठण, पुढारी वृत्तसेवा : इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या पंढरपूर येथील एका २५ वर्षीय युवकाने पैठण तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. निखिल दत्तात्रय चौडांळे ( सध्या रा. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, निखिल चौडांळे पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत इंजिनिअर या पदावर काम करीत होता. आज त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. निखिल राहत असलेल्या खोलीमध्ये काही प्रेमपत्रे पोलिसांना आढळून आली आहेत. त्यामुळे प्रेमप्रकरणातून युवकाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रेमपत्रात "तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना" असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. युवकाचा मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. युवकाचे नातेवाईक पंढरपूर येथून पैठणकडे रवाना झाले आहेत. नातेवाईक आल्यानंतर या युवकाने आत्महत्या का केली ? कुठल्या युवतीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते का ? या प्रश्नाचा उलगडा होणार आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, उपनिरीक्षक दिलीप चौरे, पोलीस बिट जमादार मंचरे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT