Latest

Malappuram boat accident | केरळमध्ये प्रवासी बोट उलटून लहान मुलांसह २१ जणांचा बुडून मृत्यू

अमृता चौगुले

मलप्पुरम (केरळ); पुढारी ऑनलाईन : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात पर्यटकांची बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. (Malappuram boat accident) एनडीआरएफच्या पथकाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. रविवारी संध्याकाळी ओट्टुमपुरमजवळ ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अपघातस्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोटीत सुमारे 25 प्रवासी होते, असे त्यांनी सांगितले. जखमी प्रवाशांना जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. (Tourist Boat Capsized In Kerala)

अनेक रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्वयंसेवकांसह बचावकार्य सुरू असल्याची माहिती यावेळी पोलीस अधिकाऱ्याने दिली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसून बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जखमींपैकी काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. Tourist Boat Capsized In Kerala)


पीएम मोदींनी ट्विट करून दुख: व्यक्त केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर दुख: व्यक्त केले असून नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'केरळमधील मलप्पुरम येथे झालेल्या बोट दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूने मला मोठे दुख: झाले आहे. मदत म्हणून PMNRF कडून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची रक्कम देण्यात येईल. (Malappuram boat accident)

त्याच बरोबर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सुद्धा एक पत्रक प्रसिद्ध करुन लोकांच्या मृत्यूबद्दल दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी मलप्पुरम जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आपत्कालीन बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अग्निशमन आणि पोलिस दल, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील तनूर आणि तिरूर भागातील स्थानिक लोक बचाव कार्यात सहभागी आहेत. अब्दुररहमान आणि रियास हे मंत्री बचाव कार्याचे समन्वय साधतील असे त्यात म्हटले आहे. (kerala boat accident)


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT