पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर भारतीय लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
जम्मू-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर पुंछमधील भातादुडियन भागात लष्करी वाहनाला आज दुपारी अचानक दुपारी आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती लष्करासह पोलिसांना देण्यात आली. तत्काळ घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले. लष्कराच्या वाहनाला कशी आग लागली, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेबाबत लकवरच माहिती दिली जाईल, असे लष्कराच्या प्रक्तत्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :