पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील ब्रजराज नगरजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. दास ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना ही घटना घडली.
एएनआयच्या वृत्तानुसार नबा दास त्यांच्या वाहनातून बाहेर पडल्यानंतर काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. स्थानिक रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा :