Arvind Kejriwal 
Latest

Arvind Kejriwal Arrested Live Updates: ‘ईडी’ कोठडीतून मुख्यमंत्री केजरीवालांचा राज्यकारभार; ‘जल’विभागाला दिला पहिला आदेश

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: आप अध्यक्ष, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडी कोठडीत आहेत. दरम्यान त्यांनी ईडीच्या कोठडीतून दिल्लीच्या जल विभागाला आदेश जारी केले आहेत. केजरीवालांचा हा आदेश जलमंत्री आतिशी यांनी आज (दि.२४) पत्रकार परिषदेदरम्यान वाचून दाखवला. (Arvind Kejriwal Arrested Live Updates)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या ताब्यातून दिल्लीच्या पाणी आणि गटार व्यवस्थेबाबत जलमंत्र्यांना सूचना दिल्या. ते म्हणाले की, ईडीच्या कोठडीत असताना अनेक भागात पाणी आणि गटाराची समस्या निर्माण झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. याबाबत जलमंत्र्यांनी मुख्य सचिवांसह सर्व अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. लेफ्टनंट गव्हर्नर यांचे सहकार्य घेतले पाहिजे. ते या प्रकरणात नक्कीच मदत करतील, अशा सूचना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडी कोठडीतून दिलेल्या आदेशात सांगितले आहे. (Arvind Kejriwal Arrested Live Updates)

केजरीवाल दिल्लीतील जनतेला आपले कुटुंब मानतात; मंत्री आतिशी

दिल्ली सरकारच्या जलमंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिल्लीचे लोक केवळ त्यांचे मतदार नाहीत, तर ते दिल्लीतील लोकांना त्यांच्या कुटुंबासारखे मानतात. हेच कारण आहे की एवढ्या कठीण परिस्थितीतही ते आपल्या कुटुंबाचा म्हणजेच दिल्लीतील लोकांचा विचार करत आहे. (Arvind Kejriwal Arrested Live Updates)

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांनी आयटीओ फूट ओव्हरब्रिजवर निदर्शने केली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे. यावेळी 'मै भी केजरीवाल' या वाक्याचे बॅनर त्यांच्या हातात झळकत होते.

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT