जॉर्जिया अँड्रियानी-अरबाज 
Latest

Arbaaz -Giorgia : जॉर्जिया अँड्रियानीने अरबाजसोबत लग्नावर पहिल्यांदाच सोडले मौन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मलायकासोबतचं नातं संपुष्टात आल्यानंतर तिचा एक्स पती आणि अभिनेता अरबाज खानचे नाव मॉडेल-अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीसोबत जोडलं गेलं होतं. दोघांच्या अफेअरच्या गरमागरम चर्चादेखील चांगल्याचं रंगल्या होत्या. २०१८ पासून अरबाज आणि जॉर्जिया यांची मैत्री आहे. रिपोर्टनुसार, आता दोघे आयुष्यभराचे साथीदार होणार असल्याचे म्हटले जात आहे. (Arbaaz -Giorgia) २०१९ पासून ते रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त अनेकदा सोशल मीडियावर येतात. अलीकडेच, एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत, जॉर्जियाने बॉयफ्रेंड अरबाज खानसोबतच्या तिच्या लग्नाच्या प्लॅनविषयी सांगितले आहे. (Arbaaz -Giorgia)

जॉर्जिया म्हणाली की, ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. जॉर्जियाने सांगितले की, महामारीमुळे अरबाजसोबतचे तिचे नाते बदलले. यामुळे लोक एकतर जवळ आले आहेत किंवा वेगळे झाले आहेत.

तिने अरबाजची एक्स पत्नी मलायकाबद्दल देखील सांगितले. ती म्हणाली- तिला मला खरोखर आवडते आणि तिच्या जीवन प्रवासाचे खूप कौतुक करते. तिच्या म्हणण्यानुसार मलायकाने शून्यातून सुरुवात केली. तिने एक मॉडेल म्हणून सुरुवात केली आणि ती आता जिथे आहे तिथे पोहोचली.

दरम्यान, जॉर्जिया अलीकडेच गुरमीत चौधरीसोबत 'दिल जिसे जिंदा हैं' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. दुसरीकडे, अरबाज हा तनाव या वेब सीरिजमध्ये शेवटचा दिसला होता. रवीना टंडन, सतीश कौशिक, मानव विज, चंदन रॉय सन्याल, जतिन गोस्वामी आणि अनुष्का कौशिक यांच्या भूमिका असलेल्या 'पटना शुक्ला' नावाच्या सोशल ड्रामाचीही तो निर्मिती करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT