नागपूर: पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रांची आज (दि.१३) छाननी करण्यात आली. यावेळी सर्वच २७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. येत्या सोमवारी (दि.१६) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. तर ३० जानेवारीला मतदान होणार आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काल विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयालक्ष्मी बिदरी आणि निवडणूक निरीक्षक अरुण उन्हाळे यांच्या उपस्थितीत अर्ज छाननी करण्यात आली. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचलंत का ?