संग्रहित फोटो 
kasturi

Apple Halwa recipe | घरी बनवा सफरचंद हलवा, जाणून घ्या रेसिपी

अनुराधा कोरवी

साहित्य : सफरचंद 1 किलो, खवा 350 ग्रॅम, साखर 1 ते सव्वा वाटी, वेलची पावडर, बदाम काप, बेदाणे, काजू तुकडे, तूप 3 चमचे.

कृती :

प्रथम दोन सफरचंदांची साले काढून घ्यावीत. कढईत तूप तापत ठेवावे. गॅस बारीक ठेवा. साले काढलेल्या सफरचंदाच्या फोडी करून बिया काढून घ्याव्यात. सफरचंदाच्या फोडी किसून घ्याव्यात.

कीस लगेच तुपात घालून परतावा. याप्रमाणे सगळी सफरचंदे साले काढून किसून तुपावर परतावीत. एकदम सगळी सफरचंद किसल्यास कीस काळा पडतो म्हणून थोडी थोडी किसून तुपावर टाकावीत. 10 मिनिटे परतल्यावर त्यात साखर घालावी. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार कमी-जास्त करावे. साखर जरा विरघळली की खवा घालावा.

वेलची पावडर घालावी. आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे घालावे. चांगले परतावे. बदामाच्या कापाने सजवावे. थंड किंवा गरम आवडीनुसार सर्व्ह करावे. हा हलवा उपवासाला चालतो.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT