Latest

Anushka Sharma : विराट झाला इमोशनल, तर पत्नी अनुष्का करू लागली जल्लोष (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : anushka sharma : विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार खेळी करत आणि आयपीएल कारकिर्दीतील ४३ वे अर्धशतक झळकावण्यात यश मिळविले. आरसीबीच्या डावाच्या १३व्या षटकात कोहलीने तिसर्‍या चेंडूवर एकच धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ५८ धावा केल्या. अर्धशतक झळकावल्यानंतर किंग कोहली एकदम निवांत दिसत होता. पन्नास झाल्यावर कोहलीने आधी आकाशाकडे पाहून इश्वराचे आभार मानण्यासारखे हावभाव केले. तर प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेली त्याची पत्नी अनुष्काची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती. अनुष्का तिच्या सीटवरून उभी राहिली आणि उत्साहात टाळ्या वाजवताना दिसली.

काही वेळातच अनुष्काचा (anushka sharma) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विराटचे अर्धशतक पाहून समालोचकांनाही आनंद झाला. सध्या समालोचकांच्या भूमिकेत असलेले अनुभवी हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनीही कोहलीच्या खेळीचे कौतुक केले. विराटच्या या खेळीचा टीम इंडियालाही फायदा होणार असल्याचे दोघांचे म्हणणे आहे.

१३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद शमीच्या चेंडूवर एकेरी धाव घेवून विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडूं त्याच्याशी शेकहँड करून विराटचे अभिनंदन करताना दिसले. तत्पूर्वी, कोहलीने शमीला दोन चौकार मारून खाते उघडले. यानंतर, पुन्हा धारदार आणि वेगवान लॉकी फर्ग्युसनने हुक शॉटवर षटकार ठोकला. त्याची ही आक्रमक खेळी पाहताना किंग कोहली फॉर्ममध्ये आल्याचे संकेत चाहत्यांना मिळाले. (anushka sharma)

या डावात तो शतकापर्यंत पोहोचू शकला नसला, तरी चाहत्यांची निराशा झाली नाही. वैयक्तिक ५८ धावांवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर तो क्लीन बोल्ड झाला. कोहलीने ५३ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि १ षटकार लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT