ॲनिमल चित्रपटातील हिंसाचरावर आज राज्‍यसभेत काँग्रेसच्‍या खासदार रजीत रंजन यांनी यंत्रणेला काही सवालही केले. 
Latest

‘Animal’ मधील हिंसाचाराचे राज्‍यसभेत पडसाद!, महिला खासदार म्‍हणाल्‍या, “मुली रडत…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नुकताच प्रदर्शित झालेला ॲनिमल हा हिंदी चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटातील हिंसाचारावर प्रचंड टीकाही होताना दिसत आहे. या चित्रपटात दाखविण्‍यात आलेल्‍या हिंसाचाराचे पडसाद आज ( दि.७) संसदेत उमटले. राज्‍यसभेत काँग्रेसच्‍या खासदार रजीत रंजन यांनी चित्रपटातील हिंसाचारावर भाष्‍य करत काही सवालही उपस्‍थित केले आहेत. ( Animal Film violence)

सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. सिनेमाचा सर्वांवर विशेषत: तरुणाईवर मोठा परिणाम होतो, असे स्‍पष्‍ट करत रजीत रंजन यांनी सभागृहात तीन मुद्दे उपस्थित केले.

Animal Film violence : किशोरवयीन मुले नकारात्मक पात्रांना आदर्श मानतात

आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येत आहेत. कबीर सिंग किंवा पुष्पा…आणि आता ॲनिमल हा चित्रपट सर्वत्र झळकत आहे. माझ्‍या महाविद्यालयात शिकणार्‍या मुलीसह अनेक मुली या चित्रपटला गेल्‍या होत्‍या. चित्रपटातील हिंसा पाहून त्‍या रडत चित्रपटगृहातून बाहेर पडल्‍या. अशा चित्रपटांद्वारे महिला सामजिकदृष्‍ट्या कमकुवत असल्‍याचे दाखवले जात आहे. कबीर सिंग आणि अ‍ॅनिमल अशा चित्रपटातून नायक आपली पत्नी, लोक, समाजाशी ज्या पद्धतीने वागताना दाखवले आहे ते भयंकर आहे. ॲनिमल चित्रपटातील हिरो हिंसाचाराचे समर्थन करतो. किशोरवयीन मुले अशा चित्रपटातील हिंसाचार हेच वास्‍तव मानतात. यामुळे अशा प्रकारचा हिंसाचार  समाजात दिसून येत आहे, अशी चिंताही खासदार रजीत रंजन यांनी व्‍यक्‍त केली.

धार्मिक भावना दुखत आहेत

'पंजाब राज्‍याला मोठा इतिहास आहे. ॲनिमल चित्रपटात "अर्जुन वेल्लीने…" असे एक गाणे आहे. अशा गाण्‍यांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या चित्रपटाचा नायक दोन कुटुंबांमधील भांडणात मोठ्या शस्त्रास्त्रांसह सार्वजनिक हिंसाचार करतो आणि कोणताही कायदा त्याला थांबवताना कसा दिसत नाही, असा सवालही रजीत रंजन यांनी सभागृहात केला.

सेन्सॉर बोर्ड अशा चित्रपटांना कसे प्रोत्साहन देते ?

'सेन्सॉर बोर्ड अशा चित्रपटांना कसे प्रोत्साहन देऊ शकेल? , असा सवाल करत अशा प्रकारचे चित्रपट आपल्या समाजातील व्‍याधी आहेत. अशा चित्रपटांची जागा आपल्या समाजात बदलली जाऊ नये, असेही त्‍यांनी यावेळी सुनावले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT