anupam kher and anil kapoor 
Latest

अनिल कपूर-अनुपम खेर यांचा मिश्किल व्हिडिओ, ‘आरआरआर’वरून धमाल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अनुपम खेर म्हणजे उत्स्फूर्त अभिनय, विनोदाचे अफलातून टायमिंग आणि वैविध्यपूर्ण भूमिकांनी सिनेरसिकांच्या मनावर गारूड घालणारे अभिनेते आहेत. आता सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या खेर यांची एक विनोदी पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. अनिल-अनुपम यांचा मिश्किल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनिल-अनुपम हे 'आरआरआर'वरून धमाल करतानाचा हा व्हिडिओ आहे.

खेर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे शेअर करत असतात. आज खेर यांनी एक मस्त विनोदी व्हीडिओ शेअर केला आहे. यात त्यांच्यासह अभिनेता अनिल कपूरही दिसतो आहे.

अभिनेता अनिल कपूर आणि खेर हे जुने मित्र आहेत. दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. या व्हिडिओत दिसते आहे की, अनिल कपूर आणि खेर दोघे एकत्र सिनेमा पाहण्यासाठी गेले आहेत. एकमेकांविषयी अगदी मिश्कील कमेंट्स करत दोघांनी व्हिडिओ केला आहे.

यात अनिल कपूर म्हणतो, "आज मला इतका आनंद झाला आहे, की जणू मी एखाद्या डेटवर गेलो आहे. मला माझे झेवियर्स कॉलेजचे दिवस आठवत आहेत." यावर खेर हसून दाद देतात. पुढे खेर म्हणतात, "आज आपण आरआरआर सिनेमा पहायला आलो आहोत. मी आणि राजमौली यांच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे, आम्ही दोघेही ३०० कोटी क्लबमधले आहोत. राजमौली तसा माझ्याही पुढे आहे."

यावर अनिल कपूर हात जोडत खेर यांना म्हणतो, "मी बिचारा ३० कोटीच्या क्लबमधला आहे. माझ्यावर तुमची कृपा असू द्या. मलाही ३०० कोटींच्या क्लबमध्ये येण्यासाठी आशिर्वाद द्या." यावर खेरसुद्धा हसून आशीर्वादासाठी हात उंचावत अनिल कपूरला 'जुग जुग जिओ' म्हणताना दिसत आहेत.

'खूप काळानंतर मी सिनेमा पहायला म्हणून थिएटरमध्ये गेलो. प्रिय मित्र अनिल कपूरसह आरआरआर पाहण्याचा अनुभव काही औरच!' असे सांगत १ मिनिट ३३ सेकंदांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT