Pimpri: An old man died in a car accident 
Latest

Islampur Accident : कामेरीजवळ झालेल्या अपघातात कराड तालुक्यातील एकजण ठार

backup backup

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : मोटरसायकलवरून देवदर्शनाला जाताना पुणे-बेंगलोर महामार्गावर कामेरी (ता. वाळवा) नजीक मोटारसायकलला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर दोघी गंभीर जखमी झाल्या. हा अपघात रविवारी दुपारी झाला. आनंदा निजगुनी माने (वय ४५, रा. तांबवे, ता. कराड) असे अपघातातील मयताचे नाव असून, त्यांची पत्नी संगीता आणि भाची श्रुती या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. (Islampur Accident)

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आनंदा हे तांबवे हे कराड येथे वास्तव्यास असून, ते शेतमजुरी करतात. रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास आनंदा हे मोटारसायकल (क्र.एम.एच.११/एफ-३४१५) वरून पत्नी संगिता, भाची श्रुती यांना घेवून जोतिबाच्या दर्शनासाठी निघाले होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ते कामेरीनजीक आले असता, पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत आनंदा हे रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटारसायकलवरील त्यांच्या पत्नी संगिता आणि श्रुती या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी इस्लामपुरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृत आनंदा यांचा मुलगा अनिकेत माने यांनी याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे. (Islampur Accident)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT