amruta khanvilkar 
Latest

Amruta Khanvilkar : ‘चंद्रा’वानी लाजली ‘चंद्रमुखी’, नजरेच्या अदांनी केलं घायाळ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नजरेच्या बाणांनी घायाळ करणारी सुंदरा चंद्रा अर्थातच चंद्रमुखीचं अप्रतिम सौंदर्य तिच्या नव्या फोटोंतून पाहायला मिळत आहे.  (Amruta Khanvilkar) पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये खूपचं सुंदर फोटोशूट तिने केले आहेत. थ्रीफोर्थ हँड असणारे ब्लाऊज, पांढरी साडी, केसांचा अंबाडा, त्यात गुलाबाची माळलेली फुले आणि त्यावर शोभतील असे इअरिंग्ज असा पेहराव अमृताने केला आहे. अमृताचं पांढऱ्या रंगाच्या साडीत रुप आणखी खुलून दिसत आहे. (Amruta Khanvilkar )

सात आठवड्यानंतरही चंद्रमुखीची जादू अद्याप मोठ्या पडद्यावर कायम आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अदाकारीने सर्वांनाच आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं आहे. (Amruta Khanvilkar)

अमृता एक अदाकारा असण्यासोबतचं नृत्यांगनादेखील आहे. ती आपले फिटनेसकडेही तितकेच लक्ष देते. अभिनेत्री अमृताची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. तिचा अभियचं नव्हे तर सुंदरता आणि डान्सच्या प्रेमात असंख्य चाहते पडले आहेत. चंद्रमुखी (Chandramukhi marathi movie) चित्रपटामुळे तिची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.

अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली ही अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मलंग, वेल डन बेबी, मुंबई सालसा, साडे माडे तीन, झक्कास, राजी, कट्यार काळजात घुसली आणि आता चंद्रमुखी यासारख्या चित्रपटांमधून तिने आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केलीय. अमृता चंद्रमुखी या चित्रपटासाठी कसून तयारी करत होती.

तिने एका मुलाखतीत म्हटले होते- चंद्रमुखीसीठी नऊवारी साडी नेसायला लागायची. एक साडी नेसायला जवळपास ३ तास लागायचे. एकदा साडी नेसली की, ती काढताना तारेवरची कसरत व्हायची. कारण एकदा साडी काढली की, ती पुन्हा नेसवायला ३ तास लागायचे. त्यामुळे तासनतास नऊवारीत राहावं लागायचं. सहनशीलता ठेवणं, या चित्रपटाच्या मेहनतीतील एक भाग होय.

अमृताचा फिटनेस

तिने चंद्रा हे केलेलं गाण्यावरील डान्सने सर्वांनाचं मोहून टाकलंय. पण, तिचा फिटनेसही तितकाचं महत्त्वाचा आहे. अमृता योगप्रेमी आहे. अमृता घरचे जेवण जेवते. फिटनेससाठी ती योग करते. चहा, पोहे, उपमा, अंडी असे पदार्थ तिच्या नाश्त्यामध्ये असतात. दुपारच्या जेवणामध्ये वरण-भात, चपाती भाजी असते. त रात्रीचे जेवण लवकर घेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT