Latest

Amruta Khanvilkar saree: अमू काय करायचं तुझं…लाजवाब, अप्रतिमच❤️

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर विषयी चंद्रमुखी म्हणू की अप्सरा असे कौतुकोद्गार कायमचं निघतात.(Amruta Khanvilkar saree) अमृता एक उत्तम नृत्यांगना आहे, हे तिने वेळोवेळी सिध्द केलंय. विशेष म्हणजे, चंद्रमुखी चित्रपटातील तिचे नृत्य आणि गाजलेले गाणे प्रचंड लोकप्रिय आहे. नेहमी सोशल मीडियावर ॲक्टीव्ह राहणारी अमृता नव्यानव्या लूकमध्ये दिसतेय. ती सोशल मीडियावर आपले अपडेट्स देतच असते. आताही तिने नवा फोटोशूट शेअर केलाय. ते फोटोज पाहून तुम्हालाही कमेंट करण्याचा मोह आवरणार नाही. इतकचं काय तर अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांनी कमेंट सेक्शनमध्ये अमृताचं कौतुक केलंय. (Amruta Khanvilkar saree)

अमृताने व्हाईट फ्लोरल साडी नेसलीय. त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज घातलं आहे. गळ्यात ज्वेलरी घातलीय. सिंपल लूक दिसत असला तरी अमृताचं सौंदर्य लाजवाब आहे. लाईट मेकअप आणि कपाळावर टिकली असा लूक तिला शोभून दिसतोय. एकामागोमाग काही फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. sunshinegirl अशी कॅप्शन या फोटोंना तिने दिलीय. प्रसाद ओकने यावर मस्त ???? ???? अशी प्रतिक्रिया दिलीय. तर मंजिरीने लिहिलंय-Agaaaaaaaa kay karaychay tuza ❤️❤️❤️❤️❤️ काही सेलिब्रिटींनी तिच्य़ा फोटोंना हार्ट इमोजी ???? शेअर केलीय.

अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अमृताने हिंदी चित्रपटातही कान केलं आहे. राजी, मलंग यासारख्या चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. वेल डन बेबी, मुंबई सालसा, साडे माडे तीन, कट्यार काळजात घुसली यासारख्या चित्रपटातून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT