नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कोणतेही विधान हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर, याचा निर्णय न्यायालय घेईल, अशा शब्दात विश्व हिंदू परिषदेने ( Vishva Hindu Parishad ) भाजपमधून हकालपट्टी करण्यातआलेल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची पाठराखण केली.
नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हटलं आहे की, "नूपुर शर्मा यांनी केलेले विधान कायदेशीर आहे की बेकायदेशीर याचा निर्णय न्यायालय घेईल. न्यायालयाच्या निर्णयाआधीच काहीजण देशात विविध ठिकाणी हिंसक प्रदर्शन करत आहेत. हिंदू देवी-देवतांबाबत अवमानकारक विधानावरील चर्चेत नुपूर शर्मा यांनी भाग घेतला होता. या चर्चेत त्यांनी केलेली विधाने बेकायदेशीर होते का? तो गुन्हा आहे का, याचा निर्णय न्यायालय घेईल."
नूपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावर अद्याप न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही. तरीही देशात यावरुन विविध ठिकाणी हिंसाचार होत आहे. या हिंसाचाराला कायदाची अनुमती आहे का? नुपूर शर्मा यांना उघडपणे धमकी दिली जात आहे. काही जण कायदा हातात घेत आहेत. हाच सर्वांत चिंतेचा विषय आहे, असेही आलोक कुमार यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :