Latest

Allu Arjun : अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ मध्ये ‘वेलकम’ मधील अनिल कपूरची केली नक्कल

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सगळ्यांच्या तोंडी फक्त आणि फक्त अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पा ( Pushpa : The Rise ) चित्रपटातील संवाद आहेत. ''पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या? फ्लॉवर नही, फायर है मैं, झुकेगा नही'', ''पुष्पा, पुष्पा राज मैं झुकेगा नहीं…साला…'' या सह त्याचे डान्स स्टेप आणि चित्रपटातील अल्लू अर्जुनची चालण्याची स्टाईल हे सर्व लोक अगदी वेड्यासारखे कॉपी करत आहे. अनेक जण या सर्वांचे रील बनवून सोशल माध्यमांवर शेअर करत आहेत.

पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) याला आपला एक खांदा वाकवून चालताना व सर्व गोष्टी करताना दाखवण्यात आले आहे. ही या चित्रपटातील अल्लू अर्जुनची स्टाईल आहे. सध्या हीच स्टाईल सर्वजण फॉलो करताना दिसत आहेत. पण, ही स्टाईल अल्लू अर्जुनने बॉलिवूड स्टार अनिल कपूर ( Anil Kapoor ) कडून चोरली आहे. अगदी अनिल कपूरची कॉपीच अल्लू अर्जुनने पुष्पा मध्ये केली आहे.

अल्लू अर्जुनला आयकॉन स्टार (Allu Arjun Icon Star) समजले जाते. तो आपल्या प्रत्येक चित्रपटातून नव नवी स्टाईल आणत असतो. शिवाय त्याची प्रत्येक स्टाईल ही फेमस होते व तीला त्याच्या चाहत्याकडून फॉलो केली जाते, त्याची कॉपी केली जाते. सुपरस्टार रजनीकांत बाबत असेच घडत होते आणि अजूनह त्याची क्रेज तशीच आहे. असंच अल्लू अर्जुन सोबत देखिल झाले आहे. म्हणूनच तो आयकॉन स्टार ठरला गेला आहे.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुष्पा या चित्रपटात एक खांदा वाकवूण चालतो. हीच त्याची या चित्रपटातील आयकॉनीक स्टाईल ठरली आहे. तसेच 'श्रीवल्ली' गाण्यात त्याने एक खांदा वाकवून पुढे पुढे सरकण्याच्या केलेल्या स्टाईलला सर्वजणच फॉलो करत आहेत. शिवाय तशी स्टेप करुन त्याचे व्हिडिओ आणि रिल्स बनवले जात आहेत.

पण, खांदा वाकवून चालण्याची ही फेमस स्टाईल अल्लू अर्जुन याने बॉलिवूडचा स्टार अनिल कपूर यांच्याकडून घेतली आहे. अनिल कपूर याने वेलकम आणि वेलकम बॅक चित्रपट केला होता. यात त्याने 'मजनू भाई' या व्यक्तीरेखीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याची मजनू भाई ही व्यक्तीरेखा खूप गाजली होती. या चित्रपटात मजनू भाई हा एक खांदा वाकवून चालत असतो. वेलकम हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. तसेच याचा सिक्वेल वेलकम बॅक हा २०१५ साली प्रदर्शित झाला होता. हा विनोदी चित्रपट चांगलाच गाजला होता तसेच यामधील अनिल कपूर आणि नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते.

यासह अल्लू अर्जुन याची दाढी खालून हात फिरविण्याची स्टाईल देखिल खूप गाजत आहे. या स्टाईल विषयी त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, दिग्दर्शक सुकुमार याने एका चित्रपटाच्या गाण्यातील डान्समध्ये अशी स्टेप पाहिली होती. तेव्हा ते या स्टेपच्या प्रेमात पडले होते. तसेच त्यांनी ठरवलं की, आपल्या पुढील चित्रपटाती ही स्टेप घ्यायची. अल्लू अर्जुन म्हणाला तो डान्स अभिनेत्री साई पल्लवी आणि अभिनेता धनुष यांच्या मारी २ या चित्रपटातील गाण्यामध्ये आहे. हा चित्रपट २०१८ साली आला होता. या गाण्यातील डान्स आणि त्याचे स्टेप देखिल गाजले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT