पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे पुरावे गृहसचिवांना सादर केले आहेत. त्यांना राज्यातील परिस्थिबद्दल सांगितले आहे. त्यांनी राज्यातील परिस्थिबद्दल चिंता व्यक्त केली आहे. असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या वाहनावर शनिवारी रात्री हल्ला झाला हाेता. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृह सचिव यांची आज भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार मीहिर कोटेचा, अमित साटम, पराग शाह, राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा यांचा समावेश होता.
(Kirit Somaiya) सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. यात किरीट सोमय्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकार व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गृहसचिवांना सर्व पुरावे सादर केले आहेत. त्यांना राज्यातील परिस्थिबद्दल सांगितले आहे. गृहसचिवांनी राज्यातील परिस्थिबद्दल चिंता व्यक्त केली. दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्रालय गंभीर दखल घेईल. सोमय्यांसह राज्यातील इतर व्यक्तींवर झालेले हल्ले चिंताजनक असून परिस्थितीचा अभ्यास करू, गरज भासल्यास राज्यात पथक पाठवू, असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय सचिवांकडून देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
सोमय्या पुढे म्हणाले की, केंद्रीय गृहसचिवांशी ३० ते ३५ मिनिटे सखोल चर्चा झाली. राज्यातील कायदा-सुवस्थेसंबंधीची माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून आली. सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींवरील हल्ले, देण्यात येणाऱ्या धमक्या, केली जाणारी जिवंत गाडण्याची भाषा यासंबंधी त्यांना माहिती दिल्याचे सोमय्या म्हणाले.
शिवसेनेच्या गुंडांकडून नेव्ही अधिकाऱ्याला घरात घूसून मारहाण केली जाते, मनसुख हिरेनची दोन पोलीस अधिकारी सुपारी घेवून हत्या करतात. या स्तरापर्यंत कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आले असताना पोलिसांच्या आवारात जीवघेणा हल्ला होतोच कसा? असा सवाल पुन्हा एकदा त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, महाराष्ट्रात कमांडोंना मारले जाते. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातात. ही उद्धव ठाकरे सरकारच्या उद्धटगिरीची हद्द आहे. त्यामुळे राज्यात विशेष पथक पाठवण्याचे आग्रह करणार असल्याची माहिती भल्ला यांना भेटीसाठी जाताना सोमय्या यांनी दिली. महाराष्ट्रात पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग केला जातोय. पोलीस आयुक्त संजय पांडे सुद्धा त्यात सहभागी आहेत. खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप सोमय्यांनी केला.
हेही वाचलतं का?