पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांना नुकतेच कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. कपूर घराण्यात छोट्या परीचे आगमन झाले आहे. आलियाला आज सकाळी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल केलं होतं आणि येथेच तिने बाळाला जन्म दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, आलियाला आज सकाळीच एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर संपूर्ण कपूर कुंटूबिय तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आलियाच्या या गुडन्यूजनंतर सोशल मीडियावर आलिया-रणबीर दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आलिया भट्ट आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न बंधनात अडकले. यानंतर आलियानं काही महिन्यांपूर्वी एक फोटो शेअर करून 'आमचं बाळ लवकरच येत असल्याची माहिती दिली होती. तर आलियाने बेबीबंप फोटशूट करून ही गुडन्यूज शेअर केली होती.आलिया आणि रणबीरची पहिली भेट 'ब्रह्मास्त्र' च्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना पाच वर्ष डेट केले आमि त्यानंतर लग्न केले होते.
हेही वाचलंत का?