alia bhatt and ranbir kapoor  
Latest

Alia Ranbir Wed : आलियाने रणबीरपूरसोबत केवळ ४ फेरे का घेतले?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाच वर्षे दीर्घकाळ डेटींग केल्यानंतर १४ एप्रिल रोजी महेश भट्ट यांची मुलगी, अभिनेत्री आलियाने लग्नगाठ बांधली. (Alia Ranbir Wed) नीतू कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरशी तिने लग्न केले आहे. या लग्नसोहळ्यात एक खास प्रसंग घडला. तो म्हणजे फेऱ्यांचा. लग्नामध्ये आलिया भट्टने रणबीर कपूरशी (Alia Ranbir Wed) सात फेरे घेण्याऐवजी चारचं फेरे घेतले. त्यामुळे त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आलिया-रणबीरने लग्नाची परंपरा बदलत सात फेरे नव्हे तर केवळ चार फेरे घेतले. आलियाचा भाऊ राहुल भट्टने चार फेरे घेण्य़ामागची कहाणी एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना सांगितली.

राहुल भट्ट म्हमाला-'रणबीर-आलिया ने आपल्या लग्नात ४ फेरे घेतले आहेत. त्यांच्या लग्नात एक विशेष पंडित होता. हा पंडित अनेक वर्षांपासून कपूर परिवारसोबत आहे. त्यांनी प्रत्येक फेऱ्याचं महत्व समजावलं. एक असतो धर्मासाठी, एक असतो अपत्यासाठी…तर हे सर्व वास्तवमध्ये खूप आकर्षक असतं. मी एका अशा घराशी संबंधित आहे, जेथे अनेक धर्माच लोक आहेत. रेकॉर्डसाठी ७ फेरे नाही तर ४ चं फेरे घेण्यात आले. मी चारी फेऱ्यांच्या वेळी तिथेच होतो.'

करिश्मा कपूरसोबत रणबीर- आलिया

रिसेप्शन होणार की नाही?

लग्नानंतर सर्वांना प्रतीक्षा आहे की, आत रिसेप्शन कधी असेल? लग्नाचे सर्व विधी पध्दती संपल्यानंतर नीतू कपूर मुलगी रिद्धिमा साहनी आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी आभार मानत आलिया आणि रणबीरला खूप सारं प्रेम देखील दिलं. यावेळी रिसेप्शन विषयी विचारण्यात आलं तर त्यांनी स्पष्ट केलं की, रिसेप्शन होणार नाही.

करण जोहरसोबत रणबीर- आलिया

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT