Ralia Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नात इमरान हाश्मीला का आमंत्रण नाही?

पुढारी ऑनलाईन डेस्क : KRK Tweet : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) यांच्यासाठी 14 एप्रिल ही तारीख आयुष्यभरासाठी संस्मरणीय ठरली. गुरुवारी रणबीर आणि आलिया लग्नाच्या बंधनात अडकले आणि ते कायमचे एक झाले. या लग्न सोहळ्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत रणबीर-आलियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. (Ralia Wedding)
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ‘रालिया’च्या लग्नावरून (Ralia Wedding) ट्विट करत असतानाच चर्चेत आलेला अभिनेता आणि समीक्षक केआरकेने (KRK) पुन्हा एक ट्विट केले आहे. यावेळी केआरकेने आलियाला इमरान हाश्मीचे नाव घेऊन टोमणा मारला आहे.
केआरकेने काय ट्विट केले?
15 एप्रिल रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास केआरकेने (KRK) एक ट्विट केले. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘बॉलिवूड किती चांगले कुटुंब आहे याचा पुरावा म्हणजे इमरान हाश्मी… आलिया भट्टच्या चुलत भावाला लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते.’ केआरकेचे हे ट्विटही इतर ट्विटसारखेच आहे. ते व्हायरल झाले असून त्यावर सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. (Ralia Wedding)
Bollywood Kitni Acchi Family hai, Uska Saboot Ye hai, Ki #EmraanHashmi cousin brother of Alia Bhatt was not invited for marriage.
— KRK (@kamaalrkhan) April 15, 2022
सोशल मीडिया युजर्सच्या प्रतिक्रिया…
या ट्विटमुळे KRK खूप ट्रोल होत आहे. सोशल मीडिया युजर्स त्यांची शाळा घेत आणि कमेंटच्या माध्यमातून त्याच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. ‘रणबीर-आलियाच्या लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते’, असे ट्विटर युजर्सचे म्हणणे आहे. त्याचवेळी काहींचे म्हणणे आहे की, ‘कदाचित इमरान हाश्मी काही शूटिंगमध्ये व्यस्त असेल’. तथापि, अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी केआरकेचे समर्थन केले आहे आणि म्हटलंय की ‘इमरान हाश्मी हा आलियाचा नातेवाईक आहे आणि अशा परिस्थितीत तिच्या कुटुंबियांनी त्याला लग्नाचे आमंत्रण द्यायला हवे होते. तो कार्यक्रमात दिसत नाही याचा अर्थ इमरानला लग्नाचे आमंत्रण नव्हते’.
सिद्धार्थला टोमणा
याआधी, रणबीर-आलियाच्या लग्नापूर्वी केआरकेने ट्विट केले होते की, ‘एकदा सिद्धार्थ मल्होत्रा माझ्याशी आलिया भट्टबद्दल भांडला. आता आलियाने तिला तिच्या लग्नाचे निमंत्रणही दिलेले नाही. त्याला आपली लायकी समजली असेल, धोबीचा कुत्रा ना घराचा ना घाटाचा. प्रिय रणबीर आणि आलिया… तुम्ही लोकांनी तुमच्या लग्नात म्हाता-याला आमंत्रित केले नाही हे खूप चुकीचे आहे. अहो, त्याचे लग्न होत नाही, बिचाऱ्याला तुमचा लग्नसोहळा बघू तर द्या’. (Ralia Wedding)