Latest

जळगाव : खडसे गटाला मोठा धक्का ; माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवक ६ वर्षांसाठी अपात्र

गणेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यातील मोठी नगरपालिका असलेल्या भुसावळ पालिकेत खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. या नगरसेवकांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.एकनाथ खडसे यांच्या सोबत भुसावळ पालिकेतील नगरसेवकांनी देखील भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. १७ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला होता. याबाबत भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी सदर माजी नगराध्यक्ष व नगरसेविकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. यानंतर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी पाच वर्षांसाठी या नगरसेवकांना अपात्र ठरवले होते. अपात्र नगरसेवकांतर्फे या निर्णयाविरोधात नगरविकास विभागाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी याप्रकरणी अंतिम सुनावणी करत ही याचिकादेखील फेटाळली आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई

माजी नगराध्यक्ष रमण देविदास भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी रमेश मकासरे, सविता रमेश मकासरे, प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, अ‍ॅड.बोधराज दगडू चौधरी, शोभा अरुण नेमाडे, किरण भागवत कोलते व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT