पुढारी ऑनलाईन डेस्क : "टायगर इफेक्ट" सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत असून त्याच्या चाहत्यांसाठी ही एक उत्सुकतेची बातमी असणार आहे. (Bade Miyan Chote Miyan) टायगरचा आगामी चित्रपट "बडे मियाँ छोटे मियाँ" चे निर्माते प्रजासत्ताक दिनानिमित्त २०२४ च्या शनिवार आणि रविवार दरम्यान चित्रपटाचा डायनॅमिक ट्रेलर रिलीज करणार असल्याच कळतंय. बॉलिवूडचा अॅक्शन सुपरस्टार आणि युथ आयकॉन टायगर श्रॉफ या चित्रपटात अॅक्शन लिजेंड अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. (Bade Miyan Chote Miyan)
संबंधित बातम्या –
सूत्रांनुसार, "टीझरमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या अॅक्शनचा समावेश आहे. तो सध्या पोस्ट-प्रॉडक्शनच्या अंतिम टप्प्यात आहे आणि चित्रपटाची टीम प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शनिवार किंवा रविवारच्या दरम्यान रिलीज करणार आहेत." चाहते प्रजासत्ताक दिनाची वाट पाहत आहेत.
"बडे मियाँ छोटे मियाँ" व्यतिरिक्त टायगरकडे सिद्धार्थ आनंद निर्मित आणि रोहित धवन दिग्दर्शित "रॅम्बो", जगन शक्ती दिग्दर्शित "हीरो नंबर १: ," आणि रोहित शेट्टीचा "सिंघम अगेन," असे चित्रपट आहेत.