पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या बोल्डनेस आदाकारीने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून उदिता गोस्वामी हिचे नाव आग्रहाने घेतले जाते. 'पाप' चित्रपटातून उदिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अल्पावधीतच ती बोल्डनेसमुळे बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात आली होती. परंतु जवळजवळ ११ वर्ष झाले, ती बॉलिवूडपासून दूर आहे. (Udita Goswami) आता तिचा बदलला लूक समोर आलाय.
उदिताने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपला लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून कोणालाही पटमार नाही की, ती एका मुलीची आई आहे. हा फोटो शेअर करत उदिता गोस्वामीने लिहिलं – 'मला वास्तवात या दिवसाची कोणतीही परवा नाही, यासाठी तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देणे आणि एक फोटो पोस्ट करणे खूपचं बोरिंग असणारं होतं. केवळ हॅलो म्हणणं आणि हे विचारणं की तुम्ही कसे आहात?' (Udita Goswami)
य प्रकारे खूप प्रेमळ अंदाजात तिने ही पोस्ट लिहिलीय. ती या फोटोमध्ये खूप स्टनिंग दिसतेय.
उदिताने जॉन अब्राहमसोबत पाप या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याचे दिग्दर्शन पूजा भट्ट हिने केले होते. यानंतर ती इमरान हाश्मीसोबत 'जहर' चित्रपटात आणि दिनो मोरियासोबत 'अक्सर'मध्ये दिसली. तसेच ती उपेन पटेलसोबत अहमद खानच्या 'क्या खूब लगती हो' च्या रिमिक्स म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे. आता उदिता गोस्वामी आज डीजेच्या दुनियेत यशाच्या शिखरावर आहे.
उदिता गोस्वामी हिचा जन्म डेहराडूनमध्ये झाला होता. तिथेच तिने नववीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील बनारसचे तर आई शिलाँगची आहे. तसेच तिची आजी आजी नेपाळी आहे. 'मर्डर २', 'आशिकी २' आणि 'एक व्हिलन' या चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सुरी हा उदिताला डेट करीत होता. त्यानंतर ती २०१३ मध्ये मोहितसोबतच लग्नाच्या बेडीत अडकली. या जोडप्याला दोन मुले आहेत. उदिताने २०१५ मध्ये मुलगी आणि २०१८ मध्ये एका मुलाला जन्म दिला.
उदिताचं आलिया भट्ट आणि इमरान हाश्मी आहे हे नातं
उदिता गोस्वामी हिचे आलिया भट्टपासून इमरान हाश्मीशी नाते आहे हे तुम्हाला माहीत आहे का? पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि ती इमरान हाश्मी वहिनी लागते. मोहित सुरी हा महेश भट्टची धाकटी बहीण हिना सुरी हिचा मुलगा आहे.
उदिताच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून झाली. बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्याआधी मॉडेल म्हणून ती अनेक जाहिरातींमधून झळकली होती. तिने पेप्सीपासून टायटन घड्याळपर्यंतच्या मोठ्या ब्रँडसाठी मॉडेल म्हणून काम केले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी डेहराडूनमधील एका फॅशन इन्स्टिट्यूटसाठी रॅम्प वॉक केले होते. त्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती दिल्लीला शिफ्ट झाली. त्यावेळी तिला हळूहळू जाहिराती मिळत गेल्या. अशी माहिती उदिताने एका मुलाखतीवेळी सांगितले होती. तसेच दिल्लीच्या टॉप मॉडेलपैकी मी एक बनले. एले मासिकात दिसणारी मी पहिली मुलगी होते, असेही तिने सांगितले होते.