पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. आज पुण्यात राष्ट्रवादीची आढावा बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तंबी दिली. "तिकीटावरून वाद नको, लोकांची काम केली नाही किंवा तिकिटावरून भांडलात तर कानाखाली आवाज काढेन," असा दम त्यांनी कार्यकर्त्यांना भरला.
"लोकांची काम करण्यासाठी तुम्हाला पद दिली आहेत. लोकांची काम केली नाही तर कानाखाली देईन, पद काढून घेईन." असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत तीन मतदारसंघाचा आढावा घेतला. ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असेल त्यांनाच लोकसभेच तिकीट मिळणार. काँग्रेसनेही अनेक मतदार संघाचा आढावा घेतला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी कसा आढावा घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे," असे पवार यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीमध्ये ज्या जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील त्या मतदारसंघांबाबात राष्ट्रवादीचे सर्व नेते एकत्र बसून, चर्चा करून निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता असेल त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान खासदार संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात गेले काही दिवस शाब्दिक चकमक सुरू होती. राऊत यांनी पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांवरू रविवारी खेद देखील व्यक्त केला आहे. याबाबत माध्यमांनी विचारले असता "त्यांच्याबद्दल आज मला काहीही बोलायचं नाही, काल बोललो आहे," असे म्हणत त्यांनी राऊत यांच्याबाबत बोलण्याच टाळलं.
हेही वाचा :