चंद्रशेखर बावनकुळे 
Latest

आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार कमळाचा प्रचार करणार: चंद्रशेखर बावनकुळे

अविनाश सुतार

पाथरी, पुढारी वृत्तसेवा: राज्यात 2024 च्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाथरी येथे केले. एका सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी बावनकुळे यांनी पंचायत समिती कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांशी भेट घेत संवाद साधला. त्यानंतर ओमकारनगर येथील वॉररूमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर एका सभेला त्यांनी संबोधित केले.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, गजानन घुगे, भाजप प्रदेश प्रवक्ता डॉ. उमेश देशमुख, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, भाजपा महानराध्यक्ष राजेश देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई चौधरी, विलास बाबर, पाथरी विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ . सुभाष कदम, माजी भाजप महानगराध्यक्ष आनंद भरोसे आदी उपस्थित होते.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, आता भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीची महायुती असून त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपणही घड्याळ, बाण या चिन्हाचा प्रचार करणार आहोत. भाजपाला तुम्ही केलेल्या मतदानानंतर दिलेल्या जाहीरनाम्यातील वचननाम्याची पूर्ती भाजपाने केली आहे. काश्मीरमधून 370 कलम हटवले आहे. अयोध्येत राम मंदिरही उभारले जात आहे. मागील नऊ वर्षात पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे पाथरी मतदारसंघातील 60 हजार घरात पोहोचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT