पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला एक मंत्रिपद देऊन गप्प केले, अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि. २७) शिंदे- फडणवीस सरकारला चिमटा काढला. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. त्यामुळ मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांचा तुम्हाला तळतळाट लागेल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. विधानसभेत बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार टोलेबाजी केली. टोलेबाजी केली.
सुरूवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारभार पाहत होते. त्यानंतर मोजक्याच लोकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. काही जण मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे दिल्लीला फोन करून एखादाचा मंत्रिमंडळाचा विस्तार करून टाका, असे आवााहन अजित पवारांनी या वेळी केले.
शिंदे – फडणवीस सरकारला त्रिपदासाठी सहा महिन्यांत एक महिला आमदार मिळाली नाही, अशी खंतही पवार यांनी या वेळी व्यक्त केली. आता अमृतावहिनी यांना सांगतो, म्हणजे म्हणजे महिलांना आमदारांना मंत्री करतील, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. भरत गोगावले मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सूट शिवून बसले आहेत. त्यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीला दुनियेत कुठेही असलो तरी उपस्थिती लावणार असल्याचे पवारांनी सांगतान सभागृहात जोरदार हशा पिकला.
बारामतीत येऊन घड्याळ बंद करण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. काही नेते बारामतीत आले आणि मी करेक्ट कार्यक्रम करतो, असे म्हणाले. परंतु मी ठरवंल तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो, असा इशारा पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव न घेता दिला. काहीच गुन्हा सिद्ध होत नसताना तुरूंगात ठेवणे अयोग्य असल्याचे सांगून त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवाईवरूनही राज्य सरकारला फटकारले.
राज्य भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ताकदवान नेते आहेत, असे भाजपच्या आमदारांशी बोलल्यानंतर लक्षात आले. परंतु शिंदे गटात तसे नाही. कारण त्यांचा सवतासुभा आहे, असा टोलाही पवारांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारला काही करता आले नाही म्हणता, मग तुम्ही काय केले ते सांगा. विदर्भातील जिल्हा बँका कुणी बंद पाडल्या. राज्यातील प्रकल्प बाहेर राज्यात गेल्यावर राज्य कारभार कसा करणार ? असा सवाल पवार यांनी केला. ईडी, सीबीआयनंतर आता विरोधकांच्या मागे एसआयटी चौकशी लावली जात आहे, असा आरोप पवार यांनी या वेळी केला.
हेही वाचलंत का ?