Ajit Pawar  
Latest

Video: बेधडक दादा ! “थोडं बारीक व्हा”, पोलीस आयुक्तांसमोरच अजित पवारांनी उपायुक्तांना दिला सल्ला

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जातात. याशिवाय आरोग्य व शारिरीक तंदरुस्तीच्या बाबतीतही अजित पवार कायम जागरुक असतात. या गोष्टींचा प्रत्यय पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमोरच पोलीस उपायुक्तांना 'थोडं बारीक व्हा' असा सल्ला दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक देण्यात आल्या. या कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त डोळे हे व्यासपीठावर प्रातिनिधीक स्वरूपात बाईकची चावी स्वीकारण्यासाठी आले होते. यावेळी अजित पवार यांनी चावी देताना त्यांच्याकडे पाहून उपस्थित असलेल्या सर्वांसमोरच 'जरा बारीक व्हा' असा सल्ला दिला.

उपायुक्त डोळे हे चावी घेऊन स्टेजवरुन खाली उतरल्यानंतर अजित पवार यांनी यासंबंधी पोलीस आयुक्तांसोबतही या विषयावर चर्चा केली. पोलिसांनी एकदम फिट राहावं यासाठी आपण माजी गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या काळात सर्व पोलिसांसाठी फिटनेस भत्ता सुरु केला याची आठवणही त्यांनी करुन दिली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT