Latest

Ajit Agarkar : अजित आगरकर होणार चीफ सिलेक्टर? BCCI लवकरच करणार घोषणा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी अष्टपैलू अजित आगरकरला (Ajit Agarkar) चीफ सिलेक्टर (bcci chief selector) बनवले जाऊ शकते. वास्तविक, तो या पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते आहे. सध्या चीफ सिलेक्टरची जबाबदारी शिव सुंदर दास सांभाळत आहे. मात्र लवकरच बीसीसीआय (bcci) नव्या चीफ सिलेक्टरची निवड जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.

चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या राजीनाम्यानंतर चीफ सिलेक्टर (bcci chief selector) हे पद रिक्त आहे. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवेल आहेत. नुकतीच याबाबत ट्विटरवरून घोषणा करण्यात आली होती. त्या आधी वीरेंद्र सेहवागशी चीफ सिलेक्टर पदासाठी संपर्क साधण्यात आल्याची बातमी समोर आली होती, परंतु माजी सलामीवीराने हे वृत्त नाकारले होते.

दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिकेटर अजित आगरकर (Ajit Agarkar) हा बीसीसीआयच्या नव्या चीफ सिलेक्टर शर्यतीत आघाडीवर आहे. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली नसली तरी आगरकरची निवड होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

आगरकरने (Ajit Agarkar) टीम इंडियासाठी (Team India) 221 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 26 कसोटी सामने, 191 वनडे आणि 4 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 58, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 288 आणि टी-20मध्ये तीन विकेट आहेत. फलंदाजीतही त्याने चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 154 डावांमध्ये 1855 धावा जमवल्या आहेत. आगरकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 16.79 च्या सरासरीने 571, वनडेमध्ये 14.59 च्या सरासरीने 1269 आणि टी-20 मध्ये 15 धावा जमा आहेत. याशिवाय आयपीएलचे 42 सामने खेळत तो 29 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे. सध्या आगरकर हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक टीमचा भाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT