shaitaan movie  
Latest

Shaitaan Trailer : ‘शैतान’ ट्रेलर लॉन्चला अजय देवगन-ज्योतिकाचा बॉसी लूक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता अजय देवगन आणि आर माधवन यांचा चित्रपट 'शैतान'चा आज ट्रेलर रिलीज झाला आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगनसोबत साऊथ स्टार ज्योतिकाने मुख्य भूमिका साकारली आहे. (Shaitaan Trailer) 'शैतान' चित्रपटाच्या ट्रेलरवरून अंदाज लावता येईल की, हा एक थ्रिलर हॉरर चित्रपट आहे. (Shaitaan Trailer )

संबंधित बातम्या –

बॉसी लूकमध्ये अजय देवगन

दिग्दर्शक विकास बहलचा चित्रपट 'शैतान'चा ट्रेलरच दमदार आहे. हा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. ट्रेलर लॉन्चवेळी0 अजय देवगन, ज्योतिका, आर माधवन आणि जानकी बोदीवाला उपस्थित होते. काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये अजय देवगन तर विलेनच्या भूमिकेतील आर माधवन स्टायलिश ओव्हरकोटमध्ये कॅमेराबद्ध झाले.

साऊथ स्टार ज्योतिका सुंदर सूटमध्ये स्पॉट

या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री ज्योतिका देखील ट्रेलर रिलीजवेळी पापराझींना पोझ देताना दिसली. ट्रेलर लॉन्चवेळी ती स्टेजवर दिसली. ब्ल्यू रंगाच्या सूटमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर अजय-ज्योतिकाचा हा लूक खूप व्हायरल होत आहे.

video- Rohit Jaiswal, cine_sdn, ℙ????? ??????? x वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT