Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटातील लूक खूपच सुंदर 
Latest

PANAMA PAPERS : अमिताभ बच्‍चन यांनाही ‘ईडी’ पाठवणार नोटीस

नंदू लटके

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

जगातील बहुचर्चित 'पनामा पेपर्स' प्रकरणी (PANAMA PAPERS ) अमिताभ बच्‍चन यांच्‍या कुटुंबासमोरील अडचणी वाढल्‍या आहेत. आज (दि. २० ) अमितभ बच्‍चन यांची सून, अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिची सक्‍तवसुली संचालनालय (ईडी) आज चौकशी करणार असून, लवकर अमिताभ बच्‍चन यांनाही नोटीस पाठवणार असल्‍याचे वृत्त एका वृत्तसंस्‍थेने दिले आहे.

'पनामा पेपर्स'मुळे जगातील प्रसिद्‍ध राजकीय नेते, उद्‍योगपती आणि कलाकारांची गुप्‍त आर्थिक व्‍यवहार उघडकीस आले होते. यामध्‍ये भारतातील ५०० हून अधिक राजकीय नेते, खेळाडू, उद्‍योगपती आणि कलाकारांचा समावेश आहे. या सर्वांवर कर चुकवेगिरीचा आरोप आहे. याप्रकरणातील करवसुली विभाग चौकशी करत आहेत.

PANAMA PAPERS : एक महिन्‍यापूर्वी अभिषेक बच्‍चन याची चौकशी

पनाना पेपर्स प्रकरणी मागील काही वर्ष चौकशी सुरु आहे. 'ईडी' चे अधिकार्‍यांनी आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. याप्रकरणी एक महिन्‍यापूर्वी अमिताभ बच्‍चन यांचा मुलगा, अभिनेता अभिषेक बच्‍चन याचीही चौकशी झाली होती. त्‍याने संबंधित कागदपत्रेही ईडी अधिकार्‍यांकडे सुपूर्द केली आहे. आता लवकरच अमिताभ बच्‍चन यांनाही 'ईडी' नोटीस बजावणार आहे.

'पनामा पेपर्स'बच्‍चन कुटुंबीयांचे नाव

२०१६ मध्‍ये ब्रिटनमधील पनामा लॉ फर्मचे तब्‍बल १.१५  पनामा पेपर्स'मुळे जगातील प्रसिद्‍ध राजकीय नेते, उद्‍योगपती आणि कलाकारांची अब्‍जाधीशांचे गुप्‍त आर्थिक व्‍यवहार उघडकीस आले होते. यामध्‍ये बच्‍चन कुटुंबीयाच्‍या नावाचाही समावेश होता. एका रिपोर्टनुसार, कागदपत्रानुसार अमिताभ बच्‍चन हे चार कंपनीचे संचालक होते. यातील तीन कंपन्‍या बहामास येथील तर एक व्‍हर्जिन बेटावरील होत्‍या. यांची स्‍थापना १९९३मध्‍ये झाली होती. या कंपन्‍यांचे भांडवल ५ हजार ते ५० हजार डॉलरच्‍या दरम्‍यान होते. मात्र या कंपन्‍या जहाज उद्‍योगात होत्‍या. त्‍यांची उलाढाल कोट्यवधी डॉलर्समध्‍ये होती.

एका कंपनीचे डायरेक्‍टर ऐश्‍वर्या रॉयला करण्‍यात आले होते. यानंतर तिला कंपनीचे शेअर होल्‍डरमधून घोषित करण्‍यात आले हाते. या कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी असे होते. या कंपनीनमध्‍ये ऐश्‍वर्या रॉय हिचे वडील के राय, आई वृंदा राय, भाउ आदित्‍य राय हे भागीदार होते. या कंपनीची स्‍थापना २००५मध्‍ये करण्‍यात आली होती. २००८मध्‍ये ही कंपनी बंद झाली हाेती.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT