Latest

SpiceJet चा १,४०० कर्मचाऱ्यांना नारळ! नेमकं कारण सांगितलं

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : बजेट एअरलाइन स्पाइसजेट (SpiceJet) १,४०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार आहे. ही नोकरकपात त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास १५ टक्के आहे. खर्चात कपात करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित टिकवून ठेवण्यासाठी स्पाइसजेटने नोकरकपातची तयारी केली आहे. स्पाइसजेटने या नोकरकपातीबाबत पुष्टी केली असल्याचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. (Spicejet Layoffs)

स्पाइसजेट एअरलाइनमध्ये सध्या ९ हजार कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडे सुमारे ३० विमाने कार्यरत आहेत. यापैकी क्रू आणि वैमानिकांसह ८ परदेशी वाहकांकडून भाडेपट्टीवर घेतलेल्या विमानांचा समावेश आहे.

"हे ऑपरेशनल आवश्यकतांनुसार कंपनीव्यापी खर्चाचे संरेखन सुनिश्चित करण्यासाठी आहे," असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. वाहकांच्या ६० कोटी पगाराच्या बिलामुळे कर्मचारी कपात करणे गरजेचे झाले आहे, असे याबाबतची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले.

"लोकांना आधीच कॉल येऊ लागले आहेत," असे एकाने नोकरकपातीचा संदर्भ देत सांगितले. स्पाइसजेट अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार देण्यास विलंब करत आहे. अनेकांना जानेवारीचा पगार अद्याप मिळालेला नाही.

स्पाइसजेटने सांगितले आहे की ते २,२०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या प्रक्रियेत आहे. पण काही गुंतवणूकदार शांत भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.

"निधीसाठी कोणताही विलंब झालेली नाही आणि आम्ही आमच्या फंड गुंतवणुकीत चांगली प्रगती करत आहोत. आम्ही याबाबत आधीच जाहीर केले आहे," असे प्रवक्त्याने म्हटले आहे. "आम्ही पुढे जात असताना आम्ही काही अतिरिक्त घोषणा करू. बहुसंख्य गुंतवणूकदार सब्सक्राइब्ड झाले आहेत." असेही त्यांनी नमूद केले आहे.

२०१९ मध्ये स्पाइसजेटकडे ११८ विमाने आणि १६ हजार कर्मचारी होते. बाजारातील हिश्श्याच्या बाबतीत त्याचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी आकासा एअर आहे. त्यांच्याकडे २३ विमाने आणि ३,५०० कर्मचारी आहेत. (Spicejet Layoffs)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT