संग्रहित छायाचित्र. 
Latest

Air India Fined : मुंबई विमानतळावर ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू, DGCAने एअर इंडियाला ठोठावला ३० लाखांचा दंड

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियावर कडक कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर एका ८० वर्षीय प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्ध प्रवाशाला विमानातून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागले. त्यामुळे प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. (Air India Fined)

या प्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला नोटीसही पाठवली होती आणि संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, नियामकाने सर्व विमान कंपन्यांना हे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत की, "ज्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान विमानात चढताना किंवा उतरताना मदतीची आवश्यकता असेल, त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हीलचेअर उपलब्ध करण्यात यावे". (Air India Fined)

Air India Fined : वृद्धाचा मृत्यू 16 फेब्रुवारीलाच

ही घटना 16 फेब्रुवारी रोजी घडली. तातडीने कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि ७ दिवसांत उत्तर मागितले होते. प्रतिसादाचे पुनरावलोकन केल्यानंतर, विमान वाहतूक नियामकाने एअर इंडियाला दोषी ठरवले. विमान कंपनीने डीजीसीएला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, प्रवाशाच्या पत्नीला व्हीलचेअर देण्यात आली होती. वृद्ध पुरुष प्रवाशाला थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात आले. वाट पाहण्याऐवजी त्याने पत्नीसह पायीच टर्मिनलवर जाणे पसंत केले.

विमान कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही

"एअर इंडियाने चुकलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध एअरलाइनने केलेल्या कोणत्याही कारवाईची माहिती दिलेली नाही आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एअरलाइनने कोणत्याही सुधारात्मक कारवाईची माहिती दिली नाही," असे डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. कारवाई दाखवण्यातही ते अयशस्वी झाले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT