Air India : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा ‘लघुशंकेचे’ प्रकरण; उपद्रवी प्रवाशाला अटक

Air India
Air India

पुढारी ऑनलाइन डेस्क : Air India : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा प्रवाशाकडून सर्वांसमोर लघुशंका करण्याचे प्रकरण समोर आले आहे. एअर इंडियाच्या 24 जूनच्या मुंबई-दिल्ली फ्लाईटमध्ये हे प्रकरण घडले. फ्लाइट दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर फ्लाइटच्या कॅप्टन ने आयजीआय विमानतळावर असलेल्या पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार दिल्ली विमानतळ पोलिसांनी या उपद्रवी प्रवाशाला अटक केली.

राम सिंह, असे या आरोपीचे नाव सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना एअर इंडियाच्या मुंबई ते दिल्ली AIC फ्लाइट क्रमांक 866 च्या उड्डाणात घडली. पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आरोपी राम सिंह याने विमानातील कार्पेटवरच लघुशंका आणि शौच केले. त्यानंतर तो तिथेच थुंकला. फ्लाइटच्या क्रू मेंबर्सने त्याला चेतावणी देखील दिली होती. मात्र, तो तरीही थांबला नाही. Air India

प्रवाशाच्या या कृतीमुळे अन्य सहप्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच ते केबिन क्रू वर भडकले देखील होते. दरम्यान, क्रूने चेतावणी देऊनही आरोपीने आपला गोंधळ सुरूच ठेवल्याने याची माहिती कॅप्टनला देण्यात आली. कॅप्टनने कंपनीला संदेश पाठवून विमानतळावर सुरक्षारक्षकांना या आरोपीला पकडण्यास सांगितले. त्यानंतर अन्य प्रवाशांना देखील आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Air India : आरोपीला अटक आणि जामीन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राम सिंह हा आफ्रिकेतील एका हॉटेलमध्ये कुकचे काम करतो. तो एअर इंडियाच्या 24 जूनला AIC866 फ्लाइटने मुंबई येथून जात होता. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट कॅप्टनने दिलेल्या तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी कलम 294/510 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला जामीन मिळाला. पुढील चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news