नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सभागृहाचे कामकाज रोखून या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली.
(bhagat singh koshyari) राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत नियम २६७ अन्वये तहकूब प्रस्तावाची सूचना दिली. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रतिष्ठित नेत्यांवर अवमानकारक टिप्पणी केली जात असून त्यामुळे राज्यातील जनतेचा अपमान होत आहे, राज्यपालांनी महाराष्ट्राच्या वीरांचा अपमान केला आहे, असा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनीही राज्यसभेत नियम २६७ अन्वये अशीच नोटीस दिली होती. पाटील म्हणाल्या की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या टिप्पणीवर चर्चा झाली पाहिजे. मात्र, अध्यक्षांनी इतर प्रस्ताव फेटाळून लावले.
हेही वाचलंत का ?