पुढारी ऑनलाईन डेस्क : वय वर्ष अवघे अकरा आणि बुद्ध्यांक अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या पेक्षाही जास्त. यापेक्षाही आश्चर्य म्हणजे तिने वयाच्या ११ वर्षी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिच नाव आहे अधारा पेरेझ सांचेझ (Adhara Pérez Sánchez). ती मेक्सिको शहरात राहते. तिची आणि तिने घेतलेल्या पदवीची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही ती प्रकाश झोतात आली आहे. जाणून घेवूया अधारा पेरेझ सांचेझ हिच्याविषयी…
Adhara Pérez Sánchez
अवघ्या अकरा वर्षांच्या मेक्सिकन मुलीची बुद्धी अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या संशोधकांपेक्षाही अधिक तीक्ष्ण आहे. तिचं नाव आहे अधारा पेरेझ सांचेझ (Adhara Pérez Sánchez). तिचा 'आयक्यू' म्हणजेच बुद्ध्यांक या दोघांपेक्षाही दोन अंकांनी अधिक आहे. अधाराची आयक्यू लेव्हल टेस्ट घेतल्यावर तिचा आयक्यू १६२ असल्याचे दिसून आले. अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांचा अनुमानित आयक्यू १६० हाेता.
अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या पेक्षा अधिक दोन आयक्यू असलेली अधारा मेक्सिकोच्या लाहुआकमधील झोपडपट्टीत राहते. २०१९ मध्ये ती केवळ तीन वर्षांची होती त्यावेळी तिला 'अॅस्पेर्जर्स सिंड्रोम' असल्याचे निदान झाले होते. हा एक विकासात्मक विकार आहे ज्यामुळे अडचणी येऊ शकतात किंवा एखाद्या व्यक्तीला सामाजिक संवाद साधणे कठीण होऊ शकते.
अधाराची आई नेल्ली सांचेज यांनी सांगितले की, अधाराला ती वेगळी असल्याने मुलं चिडवत असत. ती आपल्या काही मित्रांसह एका छोट्या घरात खेळत असताना त्यांनी तिला या घरात बंद करून 'ऑडबॉल, विअर्डो' म्हणून चिडवण्यास सुरुवात केली. त्यांनी या छोट्या घरावर दगडही मारण्यास सुरुवात केली.
2019 मध्ये युकाटन टाईम्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, जेव्हा अधारा फक्त 3 वर्षांची होती, तेव्हा तिला एस्पर्जर सिंड्रोम (ऑटिझम स्पेक्ट्रम) असल्याचे निदान झाले. हा एक विकासात्मक विकार आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला सामाजिक संवाद साधणे कठीण होऊ शकते.
अधारा डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तिला शाळेत जाण्याची इच्छा नव्हती. त्यानंतर तिची आई एका मनोचिकित्सकांकडे धेरपीसाठी घेऊन गेलो. त्यांनी अधाराला टॅलेंट केअर सेंटरमध्ये नेण्याचा सल्ला दिला. तिथेच तिचा उच्च आयक्यू लेव्हल समजला! दुर्मीळ कौशल्य असलेल्या मुलांसाठीच्या शैक्षणिक ठिकाणी शिक्षण घेण्यास ती पात्र होती.
अधाराने केवळ आठ वर्षांच्या वयातच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. तिने आपल्या अनुभवांवर आधारित 'डोन्ट गिव्ह अप' नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. मेक्सिकोतील सर्वात प्रभावशाली शंभर महिलांमध्ये तिचा समावेश झाला आहे.
अधाराने वयाच्या वयाच्या पाचव्या वर्षी तिची प्राथमिक शाळा पूर्ण केली आणि दुसर्या वर्षी मिडल आणि हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. अकराव्या वर्षी सीएनसीटी (CNCI) विद्यापीठातून सिस्टम इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर मेक्सिकोच्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून गणितातील विशेष औद्योगिक अभियांत्रिकी पदवी देखील आहे. तिला NASA सोबत काम करण्याची इच्छा आहे. सध्या सध्या ती तरुण विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन आणि गणिताचा प्रचार करून मेक्सिकन स्पेस एजन्सीसोबत काम करत आहे.
हेही वाचा :