जगातील सर्वात बुद्धिमान माणूस | पुढारी | पुढारी

जगातील सर्वात बुद्धिमान माणूस | पुढारी

चार्लस् लँगन या व्यक्‍तीला अमेरिकेबाहेर फारसे कोणी ओळखत नाही, तरी चार्लस्ला जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्‍ती मानले जाते. याचे कारण, चार्लस्चा बुद्ध्यांक म्हणजे आयक्यू 200 च्या जवळपास आहे. आइनस्टाइन, स्टीफन हॉकिंग, न्यूटन किंवा लिओनार्दो विन्सी यांच्यापेक्षा हा आयक्यू कितीतरी जास्त आहे. अतिशय बुद्धिमान असलेल्या चार्लस्ने मात्र प्राध्यापक किंवा शास्त्रज्ञ बनण्याऐवजी चक्‍क हॉटेल बाउन्सर, काऊबॉय, बांधकाम मजूर, शेत मजूर, वनरक्षक अशा नोकर्‍या करणेच पसंत केले. बाउन्सर असताना त्याने चक्‍क विश्‍व उत्पत्तीचा स्वत:चा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत सामान्य माणसाला समजणे अतिशय कठीण आहे, असे म्हणतात. हा सिद्धांत ‘पॉप्युलर सायन्स’, ‘टाइम्स’सारख्या दर्जेदार मासिकांत प्रसिद्ध झाला आहे. 

चार्लस् लँगन सहा महिन्यांचा असतानाच वाचायला शिकला व तीन वर्षांचा असताना लिहायला लागला. शाळेत असताना तो शिक्षकांपेक्षा हुशार असायचा, असे म्हणतात. त्याने कॉलेज शिक्षण अर्धवट सोडले व मेहनतीची कामे करू लागला. एका आयक्यू चाचणीत चार्लस्चा 195 आयक्यू असल्याचे सिद्ध झाले व तो प्रकाशझोतात आला. एवढा बुद्धिमान असूनही चार्लस् अतिशय नम्र आहे, हे विशेष!

संबंधित बातम्या
Back to top button