Rashmika Mandanna Relationship 
Latest

Rashmika Mandanna Relationship : रश्मिकाचे विजयसोबत ‘रिलेशनशिप’ चष्माने केलं उघड

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क ; 'गुडबाय' चित्रपटाच्या प्रमोशन आणि रिलीजनंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना मालदिवमध्ये सुट्यांचा आनंद घेण्यास गेली आहे. तर काही दिवसांपासून रश्मिका दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाला डेट ( Rashmika Mandanna Relationship ) करत असल्याची चर्चाला उधाण आलं होत. दोघांनीही अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, काही दिवसापूर्वी दोघेजण मुंबईच्या विमानतळावर काही ठराविक अतंराने स्पॉट झाल्याने पुन्हा चर्चा रंगू लागल्या. तर सध्या मालदीव येथील रश्मिकांच्या एका फोटोवरून वियज तिच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदानाने ( Rashmika Mandanna ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर मालदिवमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रश्मिका निवांत स्विमिंग पूलाच्या कडेला बसून नाष्टा करताना दिसली आहे. यात तिच्यासमोर खाण्याचे काही पदार्थ, स्विमिंग पूलातील पाणी आणि दोन खुर्च्या दिसत आहेत. यावेळी रश्मिकानं व्हाईट रंगाचा लॉग ड्रेस परिधान करत त्याच्यावर केसांची पोनी स्टाईल केली आहे. यातील खास म्हणजे, रश्मिकाने तिच्या डोळ्यावर एक सुंदर चष्मा परिधान केला आहे. याच चष्मावरून तिच्यासोबत दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा असल्याचे बोलले जात आहे. ( Rashmika Mandanna Relationship )

दोन दिवसांपूर्वी रश्मिका आणि विजय दोघेजण मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाले होते. हे कपल दोघेजण एकत्रित आले नसून पहिल्यांदा रश्मिका दिसली. तर काही वेळाने विजयदेखील कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी विजयने त्याच्या डोळ्यावर चष्मा परिधान केला होता. आता रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोत दिसणारा चष्मा हा विजयचा असल्याचे चाहत्यांनी कयास लावला आहे. यासोबत काही चाहत्यांनी रश्मिकासोबत विजय असून त्याने हा फोटो क्लिक केला असावा असे म्हटलं आहे. यामुळे हे कपल लवकरच त्याच्या रिलेशनशिपबद्दल माहिती देतील असे दिसतेय.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पहिल्यांदा 'गीता गोविंदम' चित्रपटात दिसले होते. यानंतर दोघांची जोडी 'डियर कॉमरेड' चित्रपटात दिसली. तर रश्मिकाने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत तिचा पहिला हिंदी 'गुडबाय' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात रश्मिका बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली आहे. विजय देवरकोंडा बद्दल बोलायचे तर, तो शेवटचा अनन्या पांडेसोबत 'लायगर' या चित्रपटात दिसला होता.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT