तुझेच मी गीत गात आहे 
Latest

‘तुझेच मी गीत गात आहे’ मध्ये दिसणार उर्मिला कानेटकरचा नवा अंदाज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहे. मालिकेत नुकतेच मंजुळा सातारकरची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. मंजुळाच्या येण्याने स्वराजला आपली आई वैदेहीच परत आल्याची खात्री झाली आहे. वैदेहीसारखी दिसत असली तरी मंजुळा म्हणजे, वैदेही नव्हे. आतापर्यंत स्वराज आणि तिची भेट झाली होती. मात्र आता लवकरच मंजुळा कामतांच्या घरात दाखल होणार आहे. पिहूला लोकसंगीत शिकवण्याच्या बहाण्याने तिने कामतांच्या घरात प्रवेश केला असला तरी तिचा मनसुबा मात्र, भलताच आहे. मंजुळाच्या येण्याने स्वराज आणि मोनिकाच्या आयुष्यात नवं वादळ येणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एरव्ही सर्वांवर आपली हुकुमत गाजवणाऱ्या मोनिकाला मंजुळा आपल्या हटके स्टाईलने उत्तर देताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी मंजुळाने नवं रुपही धारण केलं आहे. साडी, ठसठशीत कुंकू आणि लक्ष वेधणारे दागिने असा काहीसा मंजुळाचा अंदाज यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर मंजुळा हे पात्र साकारत आहे. या भूमिकेसाठी ती बरीच मेहनत घेताना दिसतेय. एरव्ही उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र, या भूमिकेसाठी बोलीभाषेपासून पोषाखापर्यंत सर्वच बाबतीत तिचं नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मंजुळाच्या येण्याने 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत आता कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT