Anushka Sharma : 'बम है वो'; विराटच्या शतकावर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया | पुढारी

Anushka Sharma : 'बम है वो'; विराटच्या शतकावर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादविरूद्ध तडाखेबंद खेळी करताना विराट कोहलीने (Virat Kohli)  शानदार शतक झळकावले. आयपीएल (RCB IPL 2023) कारकिर्दीतील हे त्याचे ६वे शतक आहे. या खेळीने पुन्हा एकदा विराटने रन मिशन ही बिरूदावली सार्थ ठरविली. हैदराबादने दिलेल्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने ही शतकी खेळी केली. त्याच्या या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने विराटच्या शतकावर अनोख्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये विराटच्या फलंदाजीची अनेक छायाचित्रे एका फ्रेममध्ये टाकली आहेत. आणि लिहिले आहे की ये तो,,, (फटाके इमोजी लावत), व्वा! किती छान खेळी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून बेंगलोरने एकतर्फी विजय मिळवून प्ले-ऑफमध्ये (RCB IPL 2023) स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तर हैदराबादच्या हेनरिक क्लासेनचे शतक निष्फळ ठरले. आरसीबीकडून कोहली (63 चेंडूत 100 धावा, 12 चौकार, 4 षटकार) आणि डुप्लेसी (71 धावा, 47 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार) यांच्यातील 172 धावांच्या सर्वोच्च भागीदारीमुळे 187 धावांचे लक्ष्य त्यांनी 4 चेंडू बाकी असताना 2 गडी गमावून पूर्ण केले.

कोहली आणि डुप्लेसिसची ही सर्वोच्च भागीदारी यंदाच्या मोसमातील सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोघांनी 2 एप्रिलरोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध 148 धावांच्या भागीदारीचा स्वतःचा विक्रम मोडला. या विजयासह आरसीबीचे १३ सामन्यांत १४ गुण झाले असून संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सनरायझर्स संघ आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. संघाचे 13 सामन्यांत केवळ 8 गुण झाले असून ते शेवटच्या स्थानावर आहेत.

 

हेही वाचा 

Back to top button