Ankita Lokhande Birthday  
Latest

Bigg Boss 17 : अंकितासाठी सनी लिओनी खास पोस्ट; म्हणाली, ‘ऑल द बेस्ट मी तुझ्या…’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस- 17' चा ( Bigg Boss 17 ) ग्रँड फिनाले जवळ आला असून, स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. टॉप- 3 मध्ये जागा निश्चित करण्यासाठी स्पर्धक प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर अन्य सेलिब्रिटीही आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देण्यासाठी पोस्ट करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासाठी पोस्ट लिहिल्या आहेत.

संबंधित बातम्या 

यामध्ये आता अभिनेत्री सनी लिओनीचाही समावेश झाला आहे. सनीने अंकितासाठी एक्सवर (ट्विटर) पोस्ट टाकत तिला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी रितेश देशमुख, रश्मी देसाई, अली गोणी या सेलिब्रिटींनी अंकिताला समर्थन दिले आहे.

बिग बॉसच्या घरात सध्या अभिषेक कुमार, मुनव्वर फारुखी आणि अंकिता लोखंडे हे तिघे तगडे स्पर्धक मानले जात आहेत. सनी म्हणते की, बिग बॉस -17 च्या ग्रँड फिनालेसाठी ऑल द बेस्ट अंकिता! माझा तुला पाठिंबा आहे. एकीकडे सनीने अंकिताच्या बाजूने पोस्ट लिहिली आहे, तर दुसरीकडे टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने अंकिता आणि विकीला चांगलेच सुनावले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT