ruchira jadhav  
Latest

Ruchira Jadhav : कमालीची पोरगी! रुचिराच्या वेस्टर्न फोटोंनी केली धमाल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी टीव्ही अभिनेत्री रुचिरा जाधव तिच्या कमालीच्या लूकसाठी नेहमीच चर्चेत येते. तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील लूक नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव (ruchira jadhav) माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. या मालिकेत तिने माया हे पात्र साकारले होते. अभिजीत खांडकेकरसोबत तिचीही भूमिका होती. त्च्या हटके भूमिकेने सर्वांचीच मने जिंकून घेतली. या मालिकेतही ती खूप ग्लॅमरस दिसली होती. ती रिअल लाईफमध्ये ती खूप बोल्ड आणि बिनधास्त आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी.

तिच्या या फोटोंना भरभरून कमेंट्स येत आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने ब्लॅक टॉप आणि शॉर्ट परिधान केले आहे. हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. यावर तिने केसांचा बन घातलेला दिसतोय. या लूकमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसतेय. तिचा लूक बोल्ड आणि हॉटही दिसत आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको'मधून रुचिराला प्रसिध्दी मिळाली हेती. या मालिकेत तिला पेहराव बऱ्याचदा वेस्टर्न दाखवण्यात आला होता. मालिकेत तिचा वेस्टर्न लूकही खुलून दिसायचा. ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. तिने आपले बोल्ड फोटोदेखील इन्स्टावर शेअर केले आहेत.

तिचा ग्लॅमरस लूक पाहाल तर तुम्हाला तिच्यावर कमेंट करण्याचा मोह आवरणार नाही. स्लिम ट्रीम असणारी रुचिरा रोज योगदेखील करते. तिचा जन्म १३ जुलै, १९८९ रोजी दादर येथे झाला. तिने शालेय शिक्षण पराग विद्यालय भांडूप येथून पूर्ण केले. तर महाविद्यालयीन शिक्षण के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स मुंबई येथून पूर्ण केले.

तिने अनेक कार्यक्रमात भाग घेतला. जाधवने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवरील 'तुझ्या वाचून करमेना' या मालिकेतून केली. या मालिकेतील तिची प्रमुख भूमिका होती. नुपूर सोमन असे तिच्या पात्राचे नाव होते.

मायाची भूमिका लोकप्रिय ठरली

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तिला एसबी ग्रुप ऑफ कंपनी मॅनेजरपदी दाखवले होते. तिला गुरूनाथ सुभेदार (अभिजीत खांडकेकर) ची गर्लफ्रेंड दाखवली आहे.

वेबसीरीज

'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड,' 'Fo Mo,' 'बंच ऑफ रेड रोझेस' अशा वेब सीरीजमध्ये तिने काम केलंय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT