Rubina Dilaik Twins  
Latest

Rubina Dilaik Twins : डबल धमाका; जुळ्या मुलांची आई होणार रूबिना (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'किन्नर बहू' आणि 'बिग बॉस १४' ची विजेती आणि अभिनेत्री रुबीना दिलैक तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या तब्बल ५ वर्षानंतर रूबिना आई होणार असल्याची माहिती पती अभिनव शुक्लाने दिली होती. आता चाहत्यांना तिने एका मुलाखतीत जुळ्या मुलांची आई होणार ( Rubina Dilaik Twins ) असल्याचे सांगितले आहे. मात्र, यावेळी घडलेली एक घटना आणि अभिनव शुक्लाच्या चेहऱ्यावरील हावभाव याबद्दलचीही माहिती सांगितली आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री रूबिना दिलैकने नुकतेच पॉडकास्ट 'किसी ने बता नही द ममाकाडो' या शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर प्रेंग्नसीचा ग्लो स्पष्टपणे दिसून येत होता. या शोमध्ये रूबिनाने तिच्या वैयक्तिक आयुष्य अनेक गोष्टीचा खुलासा केला. रूबिना हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

दरम्यान ती तीन महिन्याची प्रेंग्नट असताना तिचा छोटासा रस्त्यावर अपघात झाला होता. या अपघातानंतर रूबिना आणि अभिनव दोघांनी तिचे रिपोर्ट चेक केले. यानंतर रूबिना जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचे समजले. ही आनंदाची बातमी समजल्यावर अभिनव आश्चर्यचकित झाला आणि चेहऱ्यावरील वेगळेच हावभाव पाहायला मिळाल्याचे रूबिनाने सांगितले. तसेच आम्ही दोघेजण कारने घरापर्यत पोहचेपर्यत एकमेंकाशी काहीही बोललो नसल्याचाही तिने मुलाखतीत खुलासा केलाय.

रूबिनाने प्रेग्नसीदरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. याबद्दलची माहिती देताना तिने सांगितले की, डॉक्टरांनी सुरुवातीला १२ आठवडे धोका असून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. यामुळे सुरूवातीचे ३ महिने कोणालाही काहीही सांगितले नाही. दरम्यान, गर्भपात होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. यानंतर हळू-हळू माझी तब्येत ठिक होत गेली. आणि सर्व काही व्यवस्थित झालं. परंतु, डॉक्टरांनी जुळी मुलं आहेत हे सांगितल्यानंतर अभिनव खूप काळजी करत होता असेही तिने या मुलाखतीत सांगितले आहे. ( Rubina Dilaik Twins )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT